Retirement Planning : आजकाल प्रत्येकासाठी निवृत्तीचे नियोजन आवश्यक आहे. तुम्ही अजून नियोजन केले नसेल तर उशीर करू नका. तुम्ही जितक्या लवकर निवृत्तीची योजना कराल तितका फायदा होईल.
दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी रिटायरमेंट फंड असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्या गुंतवणुकीतून निवृत्तीनंतरच्या गरजा पूर्ण होतात. गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही सोल्युशन ओरिएंटेड फंडाचा पर्याय निवडू शकतात.
सोल्युशन ओरिएंटेड फंड्स म्हणजे काय ते जाणून घेऊया? आणि त्यात गुंतवणूक करून निवृत्तीचे नियोजन कसे करता येईल. सोल्यूशन ओरिएंटेड फंडातील गुंतवणुकीवर ८० सीअंतर्गत लाभ उपलब्ध आहे.
२०१८ मध्ये, बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंडांचे पूर्न वर्गीकरण केले. यामध्ये सोल्युशन ओरिएंटेड फंडाची श्रेणी समाविष्ट करण्यात आली. या फंडात मुले आणि सेवानिवृत्तधारकांसाठी निधी ठेवण्यात आला होता. हे दोन्ही फंड विशिष्ट गरजांशी निगडित आहेत. म्हणजे तुम्ही आतापासून निवृत्तीनंतरचे नियोजन सुरू करू शकतात जेणेकरून वृद्धापकाळात पैशाची चिंता राहणार नाही.
या फंडाला ५ वर्षांचा लॉक इन कालावधी आहे. म्हणजेच पाच वर्ष मुदतीपूर्वी तुम्हाला पैसे काढता येत नाहीत.
आर्थिक लक्ष्य ठरवताना, निवृत्तीनंतर एक चांगला सेवानिवृत्ती निधी कसा असेल हे लक्षात ठेवले पाहिजे. गुंतवणूक करताना किती परतावा मिळेल याची कल्पना असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही गुंतवणूक म्हणून डेट फंडात जास्त रक्कम ठेवली असेल, तर तुम्हाला चांगला परतावा मिळेल. यामध्ये ७ ते ९ टक्के परतावा मिळेल. दुसरीकडे, डेट आणि इक्विटी या दोन्हीमध्ये समान गुंतवणूक असल्यास ९ ते ११ टक्के परतावा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही इक्विटीमध्ये ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ गुंतवणूक केली, तर परतावा १८-२०% पर्यंत असू शकतो.
संबंधित बातम्या