मराठी बातम्या  /  Business  /  How To Download And Submit Life Certificate Pensioners Can Submit Seven Ways

Life Certificate : लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी पेन्शनर्सकडे उरला दीड महिना, 'या' आहेत सोप्या पद्धती

life certificate for Senior citizen HT
life certificate for Senior citizen HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Sep 13, 2023 03:59 PM IST

Life Certificate : निवृत्ती वेतनधारकांना वार्षिक जीवन प्रमाणपत्र ३० नोव्हेंबरपर्यंत दाखल करणे अत्यावश्यक असते. निवृत्तीवेतनधारक आपले जीवन प्रमाणपत्र सात वेगवेगळ्या प्रकाराने जमा करू शकतात.

Life Certificate : निवृत्ती वेतनधारकांसाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. एक निवृत्ती वेतनधारक आपले जीवन प्रमाणपत्र सहा वेगवेगळ्या प्रकारे दाखल करू शकतो. निवृत्ती वेतनधारकांसाठी डिजीटल बायोमॅट्रिक पद्धतीनेही जीवन प्रमाणपत्र दाखल करता येते. फिजिकल जीवन प्रमाण पत्र दाखल करण्यासाठी वितरण एजन्सीच्या कार्यालयात जाण्याऐवजी आधार सपोर्टेड बायोमॅट्रिक आॅथेंटिकेशनचा वापर करूनही डिजीटल लाईफ सर्टिफिकेट जनरेट करता येईल.

ट्रेंडिंग न्यूज

आधार बेस्ड डिजीटल जीवन प्रमाणपत्र

सरकारने १० नोव्हेंबर २०१४ ला निवृत्ती वेतनधारकांसाठी आधार बेस्ड डिजीटल लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाण पत्राची सुरूवात केली. निवृत्ती वेतनधारक आपले जीवन प्रमाण पत्र बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणित करण्यासाठी आपला आधार क्रमांक, बँक खात्याशी संबंधित इतर पेंन्शनची माहिती सीएससी केंद्र, बँक शाखा अथवा कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन भरू शकतात.

डिजीटल प्रमाणपत्र जमा केल्यानंतर निवृती वेतनधारकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या टेक्स्ट मेसेजमध्ये आयडी दिला जाईल. या ट्रॅन्झॅक्शन आयडीच्या मदतीने निवृत्ती वेतन धारक रेकाॅर्डसाठी jeevanpramaan.gov,in वर कंप्यूटर जनरेटेड लाईफ सर्टिफिकेट्स डाऊनलोड करू शकतात. निवृत्तीवेतनधारकांकडून देण्यात आलेल्या डिजीटल लाईफ सर्टिफिकेटच्या प्रक्रियेची पूर्तता केली जाईल.

जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी पर्याय

- जीवन प्रमाणपत्र पोर्टल

- फेस आॅथेंटिकेशन

- घरबसल्या पोस्ट खात्याच्या मदतीने

- इंडिया पोस्ट पेमेंट बँक

- एजन्सी

- डोअरस्टेप बँकिंगच्या माध्यमातूनही निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करता येते.

विभाग