योग्य बचत खाते निवडताना बँक देणारे फायदे व वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे, जे तुमच्या आर्थिक गरजांची पूर्तता करतील.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक देणारे मॅक्झिमा सेव्हिंग्ज अकाऊंट (Maxima Savings Account) इतर पर्यायांच्या तुलनेत वरचढ ठरते. हे बचत खाते पूरक व मूल्यवर्धित सेवा देते. या उत्पादनाचे बारकाईने परीक्षण केले असता प्रिमिअम ग्राहकांचे समाधान करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली अनेक वैशिष्ट्ये निदर्शनास येतात.
भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानाप्राप्त अनुसूचित व्यावसायिक बँक उज्जीवन एसएफबी (Ujjivan SFB) भारतातील २६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील ८३ लाखांहून अधिक ग्राहकांना आपल्या बँकिंग सेवा देते आणि आर्थिक व डिजिटल समावेशनाच्या माध्यमातून सेवा न मिळालेल्या व वंचित विभागांना सेवा देण्याप्रती कटिबद्ध आहे.
या गाथेमधून उज्जीवन एसएफबीसह मॅक्झिमा सेव्हिंग्ज अकाऊंट डिझाइन करण्यामध्ये समाविष्ट पायऱ्या, तसेच हे खाते उघडण्याचे अनेक फायदे स्पष्ट होतात.
सामान्यत: मॅक्झिमा सेव्हिंग्ज अकाऊंटचे विविध इन्सेन्टिव्ह्ज देण्यासोबत ग्राहकांना आर्थिक स्वावलंबीपणा सहजपणे संपादित करण्यास मदत करण्यासाठी बँकिंग अनुभव सुधारण्याचे ध्येय आहे. यामध्ये आधुनिक व प्रिमिअम ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेली वैशिष्ट्ये आहेत, तसेच ग्राहकांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
उज्जीवन एसएफबीमध्ये मॅक्झिमा सेव्हिंग्ज अकाऊंट उघडण्याची प्रक्रिया जलद व सोईस्कर आहे. ग्राहकांसाठी दोन पर्याय आहेत: ते बँकेची वेबसाइट किंवा मोबाइल अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात; किंवा ते देशभरातील जवळच्या कोणत्याही उज्जीवन एसएफबी शाखांना भेट देऊ शकतात.
वैध ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र.
वैध पत्त्याचा पुरावा जसे आधार कार्ड, पासपोर्ट किंवा वीज बिल.
अलिकडील पासपोर्ट आकाराचा फोटो.
प्रारंभिक ठेव रकमेसाठी धनादेश किंवा रोख.
खाते किमान १ लाख रूपयांच्या ठेवीसह उघडता येऊ शकते किंवा ग्राहक शिल्लक पात्रता निकषाची पूर्तता करण्यासाठी मुदत ठेवीमध्ये १५ लाख रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जमा ठेवू शकतात. खाते उघडल्यानंतर ग्राहकांना वेलकम किट मिळते, ज्यामध्ये खात्याची सविस्तर माहिती, चेकबुक आणि रूपे सिलेक्ट डेबिट कार्ड असते.
बँकिंग अनुभव सुधारण्यासाठी अनेक फायदे देत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे (Ujjivan Small Finance Bank's) मॅक्झिमा सेव्हिंग्ज अकाऊंट पारंपारित बँकिंग मर्यादांना दूर करते. काही प्रमुख फायदे पुढीलप्रमाणे:
जवळपास ७.५ टक्के वार्षिक व्याजदर मिळवा, जो उद्योगामध्ये सर्वोच्च आहे. हे व्याज दररोज गणन केले जाते आणि दर तिमाहीनंतर खात्यामध्ये जमा होते.
कोणत्याही उज्जीवन एसएफबी शाखेमध्ये अमर्यादित पैसे भरण्याच्या किंवा पैसे काढण्याच्या सुविधेचा आनंद घ्या, ज्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच कोणत्याही बँक एटीएममधून अमर्यादित एटीएम व्यवहार करा.
सर्व माध्यमांमध्ये मोफत NEFT, RTGS व IMPS व्यवहारांसह, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व फोन बँकिंग, तसेच चेकबुक्स व डिमांड ड्राफ्टच्या विनामूल्य वितरणाचा आनंद घ्या.
पहिल्या वर्षासाठी पूरक आरोग्य सेवांसह आरोग्य तपासणी, डॉक्टर सल्लामसलत, औषधांमध्ये सूट आणि हॉस्पिटलायझेशन कव्हरचा लाभ घ्या.
उच्च दैनंदिन एटीएम कॅश विद्ड्रॉवल मर्यादा आणि सुधारित पीओएस व ई-कॉमर्स मर्यादांमधून लाभ घ्या, तसेच पसंतीच्या भाषांमध्ये २४*७ कस्टमर केअर सर्विसेसचा आनंद घ्या.
एअरपोर्ट लाऊंज अॅक्सेस, वैयक्तिक अपघात व टोटल परमनण्ट डिसॅबिलिटी कव्हरेज आणि विशेष मर्चंट ऑफर्स असे विशेष फायदे असलेले रूपे सिलेक्ट डेबिट कार्ड मिळवा