मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Pm Kisan yojana : पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसतील तर ताबडतोब करा 'हे' काम

Pm Kisan yojana : पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात आले नसतील तर ताबडतोब करा 'हे' काम

Jun 19, 2024 10:32 AM IST

PM Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तुमचे पैसे आले की नाही कसं चेक कराल? वाचा!

पीएम किसान निधीचा एसएमएस आला नसेल तर ताबडतोब करा 'हे' काम
पीएम किसान निधीचा एसएमएस आला नसेल तर ताबडतोब करा 'हे' काम

PM Kisan Samman Nidhi Yojana 17th installment : शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा म्हणून सुरू करण्यात आलेल्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १७व्या हप्त्याचे पैसे लाभार्थींच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. हे पैसे खात्यात आल्यानंतर लगेचच मोबाइलवर SMS येणं अपेक्षित आहे. तसा संदेश आला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी काही गोष्टी करण्याची गरज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आधी तुम्ही तुमचं स्टेटस चेक करून तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत हे जाणून घेऊ शकता. त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. हे तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवरच तपासू शकता. पीएम किसान योजनेअंतर्गत १२.५४ कोटींहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी नव्यानं नोंदणी होत आहे. या नोंदणीत अनेक त्रुटी असतात. अनेकदा पात्र नसलेले लोकही नोंदणी करतात. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येताना अडचण होऊ शकते. ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी खालील गोष्टी कराव्या…

सर्वात आधी पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर जा.

इथं तुम्हाला उजव्या बाजूला 'फार्मर्स कॉर्नर'चा पर्याय मिळेल.

तिथं 'नो युअर स्टेटस' या पर्यायावर क्लिक करा. इथं एक नवीन पेज ओपन होईल.

नवीन पेजवर आपला नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.

त्यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.

इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. म्हणजे तुमच्या खात्यात कोणता हप्ता आला आणि तो कोणत्या बँक खात्यात जमा झाला हे कळेल.

तुम्हाला एसएमएस मिळत नसेल तर पुढील क्रमांकावर संपर्क साधू शकता!

पीएम किसान टोल फ्री नंबर करा : 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261

पीएम किसान लँडलाइन नंबर : 011-23381092, 23382401

पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606

पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन आहे : 0120-6025109

ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

याशिवाय, शेतकरी पीएम-किसान पोर्टलवर आपल्या तक्रारी नोंदवू शकतात आणि वेळेवर तोडगा काढण्यासाठी २४x७ कॉल सुविधेची मदत घेऊ शकतात.

WhatsApp channel
विभाग