PM kisan : प्रतीक्षा संपली! २८ फेब्रुवारीला बँक खात्यात येणार पीएम किसान योजनेचे पैसे, असं चेक करा तुमचं नाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM kisan : प्रतीक्षा संपली! २८ फेब्रुवारीला बँक खात्यात येणार पीएम किसान योजनेचे पैसे, असं चेक करा तुमचं नाव

PM kisan : प्रतीक्षा संपली! २८ फेब्रुवारीला बँक खात्यात येणार पीएम किसान योजनेचे पैसे, असं चेक करा तुमचं नाव

Updated Feb 22, 2024 11:22 AM IST

PM Kisan Samman nidhi 16th installment : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेला पीएम किसान योजनेचा १६वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan Samman Nidhi Yojana 16th Installment
PM Kisan Samman Nidhi Yojana 16th Installment

PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेच्या १६व्या हप्त्याची तारीख ठरली आहे. त्यानुसार येत्या २८ फेब्रुवारी रोजी या योजनेच्या १६ व्या हप्त्यांची रक्कम देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. 

पीएम किसानचा नवा हप्ता तुम्हाला मिळणार का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं नाव २०२४ च्या नवीन यादीत पाहावं लागेल. त्यासाठी कुठंही जाण्याची गरज नाही. तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर किंवा कॉम्प्युटरवरून घरी बसूनच तुम्ही ते तपासू शकता.

कसे तपासाल नाव?

तुमचं नाव पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २०२४ च्या यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा…

सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जा (https://pmkisan.gov.in/).

इथं तुमच्या उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पहा. तिथं लाभार्थी यादीवर क्लिक करा.

एक नवीन विंडो उघडेल. तिथं तुम्हाला आजची नवीन यादी मिळेल. योग्य ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा म्हणजे तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल.

लाभार्थी सद्यस्थिती अशी तपासा!

तुमचे कोणते हप्ते मिळाले किंवा मिळाले नाहीत? पैसे थांबले असतील तर त्याचं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, तुमची लाभार्थी स्थिती तपासा. त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा…

फार्मर कॉर्नरवर Know Your Status वर क्लिक करा.

इथं तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरा आणि Get OTP वर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर मिळालेला OTP टाकून सद्यस्थिती तपासा.

तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास वरील निळ्या पट्टीवर तुमचा नोंदणी क्रमांक लिहिलेला असेल हे लक्षात ठेवा. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाकून नोंदणी क्रमांक मिळवा.

Whats_app_banner