मराठी बातम्या  /  business  /  2000 notes exchange : २००० च्या नोटा खपवण्यासाठी ग्राहक लढवतायेत शक्कल, दुकानदारांसाठी ठरतेय ही संधी
2000 notes ht
2000 notes ht

2000 notes exchange : २००० च्या नोटा खपवण्यासाठी ग्राहक लढवतायेत शक्कल, दुकानदारांसाठी ठरतेय ही संधी

24 May 2023, 18:07 ISTKulkarni Rutuja Sudeep

2000 notes exchange : दुकानदारही २००० रुपयांच्या नोटांकडे विक्री वाढवण्याच्या उद्देशाने पाहत आहेत. मुंबईत एका भाजीवाल्यापासून ते राडो वाॅचच्या स्टोअरपर्यंत एकच गुलाबी रंगाची २००० नोट सर्वांच लक्ष वेधून घेतेय. ग्राहक मोठ्या संख्येने २००० रुपयांची नोट पुढे करत आहेत.

2000  notes exchange : २००० रुपयांच्या नोटा लवकरात लवकर खपवण्यासाठी लोक आता दैनंदिन वस्तूंसह लक्झरी ब्रँडेड वस्तू खरेदी करण्यासाठीही बाजारात उतरत आहेत. २०१६ मध्ये उद्धभवलेल्या चलन टंचाईच्या तुलनेत यंदा परिस्थिती चांगली आहे. पण बँकांमध्ये नोटा परत करण्यासाठी भल्ल्या मोठ्या रांगेत उभे राहण्याऐवजी लोक शाॅर्ट कट वापरत आहेत. त्यात दैनंदिन वस्तूंच्या खरेदीपासून लक्झरी वस्तूंच्या खरेदीपर्यंतचा पर्याय आजमावताना दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दुकानदारही २००० रुपयांच्या नोटांचा फायदा घेऊन विक्री वाढवण्यासाठी करत आहेत. मुंबईतील क्राॅफर्ड मार्केटमध्ये एका आंबा विक्रेत्याने सांगितले की, शनिवारपासून बहुतांश लोकं आंबे खरेदीसाठी २००० रुपयांच्या नोटेचा वापर करत आहेत. दररोज मला ८ ते १० नोटा मिळत आहेत. मी ते स्विकारतो. माझ्याकडे कोणताही पर्याय नाही. हा माझा व्यवसाय आहे. मी या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करेन.

मध्य मुंबईतील एका माॅलमध्ये राडो स्टोअरचे मॅनेजर मायकल मार्टिसने सांगितले, रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर त्यांच्याकडे २००० रुपयांच्या नोटा ह्या ६० ते ७० टक्के येऊ लागल्या आहेत. मार्टिनने सांगितले की यामुळे आम्हाला नवी संधी मिळाली आहे. राडोच्या घडाळ्याची विक्री १ ते २ टक्क्यांवरुन ३ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

झोमॅटोच्या आँनलाईन डिलिव्हरीही रोखीतच

झोमॅटोने त्यांच्या ट्विटर खात्यावर सांगितले की, शुक्रवारपासून त्यांच्या कॅश आँन डिलिव्हरी चे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन दिवसात तब्बल ७२ टक्के व्यवहार सीओडीने केले जात आहेत. दरम्यान, यात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीच्या प्रवक्त्याने दिले आहे.

दक्षिण मुंबईतील एका रेस्टाॅरंटच्या मालकाने सांगितले की, मी २००० च्या नोटा स्विकारत नाही आणि स्विकारणारही नाही. मी त्या नोटा बँकांमध्ये जमा करण्याच्या त्रासापासून वाचण्याचा प्रयत्न करतोय.

दिल्ली मुंबईत ग्राहक मोठ्या प्रमाणात बँकेत नोटा बदलण्यासाठी जात होते. मुंबईत आणि दिल्लीत बँकेतील वातावरण शांत होते. लोकं शांतपणे लाईन लावून नोटा बदलत होते. अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना त्रास करावा लागल्याचे वृत्त आहे. स्टेट बँकेत सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली.

विभाग