मराठी बातम्या  /  बिझनेस  /  YouTuber बनायचे आहे? यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी काय करावे?

YouTuber बनायचे आहे? यशस्वी युट्यूबर बनण्यासाठी काय करावे?

May 21, 2024 08:52 PM IST

How to become YouTuber : डिजिटल युगात तरुणांना करिअरच्या अनेक नवनवीन वाटा खुणावत असतात. यूट्यूबर ही त्यातली करिअर बनवण्यासाठीची एक चांगली वाट आहे. यूट्यूबर होण्यासाठी काय करावे लागते, हे वाचा.

How to become  a Successful YouTuber
How to become a Successful YouTuber (AP)

आपल्या मुलांच्या करिअरचे नियोजन करताना अनेक पालकांना आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर, बँक अधिकारी, आयआयटी, एमबीए, बीटेक सारख्या करिअरच्या वाटांचा विचार करताना दिसतात. परंतु डिजिटल युगात वावरत असणारी अनेक तरुण मुलं-मुली मात्र वेगळ्या वाटा चोखाळण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. हल्ली मोबाइलचा जमाना आहे. आणि डिजिटल युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण भरघोस कमाई करताना दिसत आहे. अशावेळी अनेक तरुणांना डिजिटल क्रिएटर, यूट्युबर (YouTuber) होण्याची इच्छा असते. नव्हे हल्ली तर अनेक तरुण हे YouTuber म्हणून उत्तम करिअर करताना दिसत आहेत. पारंपरिक नोकरीच्या तुलनेत YouTuber बनण्याचे अनेक फायदे आहेत. यात तुम्हाला मनाप्रमाणे काम करण्याचे खुले स्वातंत्र्य असते. शिवाय तुम्ही तुमच्या घरात बसून हे काम करू शकतात. अशाप्रकारे तुम्ही स्वतः तुमचे बॉस असता. काहीजण यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतात तर काही जण थेट या क्षेत्रात प्रवेश करून आपलं स्थान निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. यूट्यूबर म्हणजे काय, यूट्यूबर बवण्यासाठी काय करावे लागते? या सर्वांची माहिती या लेखातून आपण घेणार आहोत. 

ट्रेंडिंग न्यूज

YouTuber बनणे म्हणजे काही आगळेवेगळे काम नसते. तुम्ही सोशल मीडिया किंवा यूट्यूबवर जे विविध प्रकारचे, मनोरंजनात्मक, माहितीपर व्हिडिओ पाहत असता, ते काम करणे म्हणजे यूट्यूबर बनणे असा साधा सरळ याचा अर्थ आहे. परंतु प्रोफेशन यूट्यूबर होणे तसे अगदी सोप्पे काम असते, असेही नाही. या कामासाठी तुमच्याकडे नक्कीच काही ठराविक कौशल्ये असणे आवश्यक असते. यूट्यूबर म्हणून तुम्ही प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन माहितीपर, मनोरंजनात्मक, त्यांना खिळवून ठेवणारे व्हिडिओ देत नसाल तर मग प्रेक्षक तुमच्या चॅनलवर येत नाही. यासाठी काय करणे गरजेचे असते, ते पाहू या.

YouTuber म्हणजे काय? 

प्रोफेशनल YouTuber ही अशी व्यक्ती असते ज्याला त्याच्या स्वतःच्या YouTube चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओसाठी पैसे मिळत असतात. तुम्हाला पूर्णवेळ आणि यशस्वी YouTuber व्हायचे असेल तर तुमच्याकडे काही विशिष्ट कौशल्ये असणे आवश्यक असते. जसेः

१) उत्तम संवाद साधण्याची कला

२) व्हिडिओ एडिटिंगचे कौशल्य

३) लवचिकता

४) टीका सहन करण्याची क्षमता

५) सब्स्क्रायबर्सशी संवाद साधणे

६) ब्रँडशी संपर्क करून जाहिराती मिळवण्याची कौशल्य

 

यशस्वी YouTuber बनण्यासाठी ही काही प्राथमिक कौशल्ये तुमच्याकडे असणे गरजेचे असते.

यापुढील भागात आपण यशस्वी YouTuber बनण्याचे सूत्र काय, याची माहिती घेऊ या.

 

 

 

WhatsApp channel
विभाग