EPFO : ईपीएफओच्या कर्मचारी पेन्शन योजनेंतर्गत अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी आज अंतिम संधी आहे. यासाठीची अंतिम मुदत ११ जुलै आहे. याआधी अंतिम मुदत दोन वेळा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वेळी अंतिम मुदत वाढवण्याची शक्यता धुसर आहे.
गेल्या वर्षी वाढीव पेन्शन योगदानासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जून होती. पण ईपीएफओच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे ती ११ जुलैपर्यंत वाढवण्यात आली. ज्या अर्जदारांना वेतन विवरणाची पडताळणी करण्याची आवश्यकता आहे, ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३ महिन्याचा अवधी देण्यात आला आहे.
- अशा सदस्यांनी आपल्या तत्कालीन वेतन सीमेपेक्षा ५ हजार रुपये ते ६५०० रुपयांचे योगदान दिले असेल.
- जे सदस्य १ सप्टेंबर २०१४ पूर्वी ईपीएसचे सदस्य होते आणि त्यानंतरही सदस्यत्व कायम आहे.
कर्मचारी ईपीएफओच्या या खास सुविधेसाठी यूएएन पोर्टलवर लाॅग इन करु शकतात. पात्र कर्मचारी या पोर्टलवर जाऊन अर्ज सादर करु शकतात. यासाठी सगळ्यात आधी ईपीएफओच्या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर लाँग इनचा पर्याय स्विकारा. यानंतर युएएन पोर्टलचा पर्याय स्विकारुन लाॅग इन करण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
संबंधित बातम्या