Viral News : बेंगळुरूमध्ये फक्त सँडविच विकून फ्रेंच माणसाने ५० कोटी कमावले! जाणून घ्या कसे?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Viral News : बेंगळुरूमध्ये फक्त सँडविच विकून फ्रेंच माणसाने ५० कोटी कमावले! जाणून घ्या कसे?

Viral News : बेंगळुरूमध्ये फक्त सँडविच विकून फ्रेंच माणसाने ५० कोटी कमावले! जाणून घ्या कसे?

Dec 08, 2024 07:49 AM IST

Bengaluru Sandwiches News: फ्रान्सचे उद्योजक निकोलस ग्रॉसेमी यांनी भारतात ५० कोटी रुपयांचे सँडविच

Nicolas Grossemy, the founder of a popular food chain in Bengaluru.
Nicolas Grossemy, the founder of a popular food chain in Bengaluru. (Instagram/Nicolas Grossemy)

Business Tips: बिझनेस स्टडीसाठी भारतात आलेल्या एका फ्रेंच व्यक्तीने फूड बिझनेस कसा करायचा? सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.  भारतात फूड बिझनेस करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, असे त्याने युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

गॉर्मेट सँडविच चेन पॅरिस पाणिनीचे संस्थापक निकोलस ग्रॉसेमी यांनी ५० कोटी रुपयांचे साम्राज्य उभे केले.  विद्यार्थी ते फूड एंटरप्रेन्योर असा त्यांचा प्रवास नुकताच ग्रोथएक्सच्या एका युट्युब व्हिडिओमध्ये अधोरेखित करण्यात आला, ज्यात भारतात भरभराटीचा फूड बिझनेस तयार करण्यासाठी काय करावे लागते? याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.

ग्रोसेमी यांनी सांगितले की, तो मूळचा फ्रान्समधील आहे, जिथे त्याचे आई-वडील दोघेही शिक्षक होते. ग्रोसेमी यांना स्वंयपाकघरात आपल्या आईला मदत करताना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली, ज्यामुळे त्यांना फूड बिझनेसची प्रेरणा मिळाली. वयाच्या २२ व्या वर्षी निकोलस पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी भारतात आला. ब्रेड आणि सँडविचची आवड असणारा त्यांनी सांगितले की, सँडविच हा त्याच्या लहानपणीच्या जेवणाचा मुख्य भाग होता. 

बिझनेसमध्ये कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?

निकोलस यांना व्यवसाय करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे समजावून सांगितले आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्याला देण्यात येणारे नाव काळजीपूर्वक निवडावे. हे नाव व्यवसायाशी संबंधित असावे, जे ग्राहकांना आकर्षित करण्यास मदत करेल. या नावामुळे ग्राहक आपल्याशी जोडले गेले पाहिजे. व्यवसाय मोठा करण्यासाठी आणि चांगली ओळख निर्माण करण्यासाठी स्पष्टता असायला हवी, असेही त्यांनी म्हटले आहे.

बिझनेस समीकरण कसे असते?

फूड बिझनेस समीकरण सांगितले आहे.  फूड बिझनेसमध्ये खाण्यापिण्याचा खर्च साधारणत: २८ टक्के, भाडे १० टक्के, मेहनत १५ टक्के, प्रशासकीय खर्च १० टक्के आणि विपणन खर्च ५ ते १० टक्क्यांच्या दरम्यान येतो. यामुळे नफ्याचे मार्जिन अंदाजे १५ टक्के राहते, असे निकोलस सांगतात.

Whats_app_banner