मराठी बातम्या  /  Business  /  How Rekha Jhunjhunwala Earned Rs 1390 Crores In A Month, Titan Share Played Big Role

Share market : एका महिन्यात कमावले १३९० कोटी? हे कसं घडलं?

Rekha Jhunjhunwala
Rekha Jhunjhunwala
Ganesh Pandurang Kadam • HT Marathi
Sep 14, 2023 07:02 PM IST

Rekha Jhunjhunwala earns from Titan share : शेअर बाजारातील आघाडीच्या गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मागच्या एका महिन्यात तब्बल १३९० कोटी रुपये कमावले आहेत. कसे ते वाचा!

Rekha Jhunjhunwala News today : देशातील आघाडीच्या गुंतवणूकदारांपैकी एक असलेल्या रेखा झुनझुनवाला यांनी शेअर बाजारातून मागच्या एका महिन्यात तब्बल १३९० कोटी रुपयांची कमाई केली आहे. टाटा समूहातील टायटन कंपनीचा शेअर वाढल्यामुळं झुनझुनवाला यांना हा नफा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टायटनच्या शेअरनं आज काही प्रमाणात घसरला असला तरी आजच या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. टायटनमधील या तेजीचा सरकारी विमा कंपनी एलआयसीलाही मोठा फायदा झाला आहे.

झुनझुनवाला यांनी कसे कमावले १३९० कोटी?

एक महिन्यापूर्वी १४ ऑगस्ट २०२३ रोजी टायटनचा शेअर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) ३००९.७५ रुपयांवर ट्रेड करत होते. आज १४ सप्टेंबर २०२३ रोजी हेच शेअर्स ३२९२.८० रुपयांवर पोहोचले. मागच्या महिनाभरात हे शेअर्स ८.३५ टक्क्यांनी, अर्थात २५१.३० रुपयांनी वाढले आहेत.

जून २०२३ तिमाहीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडं टायटनचे ४,७५,९५,९७० शेअर्स होते. म्हणजेच, झुनझुनवाला यांचा या कंपनीमध्ये ५.३६ टक्के इतका हिस्सा आहे. टायटनच्या शेअरमध्ये एका महिन्यात २५२ रुपयांची वाढ झाल्यानं रेखा झुनझुनवाला यांना सुमारे १३९० कोटी रुपयांचा नफा झाला आहे. म्हणजेच एका महिन्यात त्यांची संपत्ती १३९० कोटी रुपयांनी वाढली आहे.

एलआयसीला ४५० कोटी रुपयांचा नफा

सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ला देखील टायटनच्या शेअरमधील वाढीचा मोठा फायदा झाला आहे. यंदाच्या जून अखेरच्या तिमाहीच्या आकडेवारीनुसार, एलआयसीकडं टायटनचे १,५६,८६,७७१ शेअर्स किंवा कंपनीमध्ये १.७७ टक्के हिस्सा आहे. टायटनचे शेअर्स एका महिन्यात २५२ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळं एलआयसीच्या एकूण संपत्तीत ४५४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या ६ महिन्यांत LIC चे शेअर्स सुमारे ४० टक्क्यांनी वाढले आहेत.

(डिस्क्लेमर : हा लेख शेअर बाजारातील आकडेवारी व कंपनीच्या कामगिरीवर आधारीत आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं वाचकांना गुंतवणुकीचा निर्णय आपल्या तज्ज्ञांशी चर्चा करूनच घ्यावा.)

विभाग