TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

TCS CEO Salary : भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS च्या सीईओचा दर महिन्याचा पगार माहितीय का? वाचून व्हाल थक्क!

May 10, 2024 09:36 AM IST

भारतात सॉफ्टवेअर क्षेत्रात अग्रगण्य मानली जाणारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या सॉफ्टवेअर कंपनीच्या सीईओला वर्षाला २५ कोटी ४० लाख रुपये वेतन मिळते, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

K Krithivasan salary: Tata Consultancy Services Ltd (TCS) CEO K Krithivasan during a press conference in Mumbai.
K Krithivasan salary: Tata Consultancy Services Ltd (TCS) CEO K Krithivasan during a press conference in Mumbai. (PTI)

भारतात सॉफ्टवेअर क्षेत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services) ही सॉफ्टवेअर कंपनी अग्रगण्य मानली जाते. जगभरातील ५० देशांत सहा लाखांपेक्षा जास्त कर्मचारी संख्या असलेल्या या कंपनीची वार्षिक उलाढाल तब्बल १ अब्ज ४२ कोटी रुपयांच्या घरात आहे. या कंपनीचे सीईओ आणि एमडी पदावर कार्यरत के. कृतिवासन यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षात कंपनीने २५.४ कोटी रुपये वेतन दिले आहे. अशाप्रकारे कृतिवासन यांचे महिन्याचे वेतन २ कोटी १ लाख रुपये होते. कृतिवासन यांनी १ जून २०२३ रोजी पदभार सांभाळला होता. ते गेले तीस वर्ष टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कार्यरत असून त्यांनी यापूर्वी कंपनीच्या बँकिंग, वित्तसेवा आणि विमा उद्योगाचे ग्लोबल हेड म्हणून काम केले होते. कृतिवासन यांनी मद्रास विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर आयआयटी कानपूरमधून त्यांनी इंडस्ट्रिअल अँड मॅनेजमेंट इंजिनियरिंगचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. 

टीसीएस कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ?  

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जारी केलेल्या वार्षिक अहवालानुसार कंपनीने २०२४ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी १०.८ टक्के पगारवाढ दिली आहे. भारतातील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनात सरासरी ५.५ ते ८ टक्के वाढ झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जगभरातील ५० देशांमध्ये ६,०१,५४६ कर्मचारी असून कंपनीच्या टॉप परफॉर्मर्सना दोन अंकी वेतनवाढ मिळाल्याचेही वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, Tata Consultancy Services माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांना आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २९.१६ कोटी रुपये वेतन मिळाले होते. तर कंपनीचे मुख्य परिचालन अधिकारी आणि कार्यकारी संचालक एन. गणपती सुब्रमण्यम यांना आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २६.१८ कोटी रुपये पगार मिळाला होता.

कर्मचाऱ्यांच्या मानधनात झालेली वाढ ही संबंधित देशांमधील बाजारपेठेच्या ट्रेंडशी सुसंगत असून कंपनीची आर्थिक कामगिरी प्रतिबिंबीत करते असं या अहवालात म्हटलं आहे. संस्थेची कामगिरी आणि कर्मचाऱ्याची वैयक्तिक कामगिरी जोडून ही पगारवाढ करण्यात आल्याचे वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे.

 

Whats_app_banner