swiggy zomato delivery boy salary : Zomato, Swiggy सारखे अनेक ॲप्स जवळपास प्रत्येक मोबाईलमध्ये दिसतात. या ॲप्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आवडत्या रेस्टॉरंटमधील जेवण एका क्लिकवर थेट घरपोच सर्व्ह केलं जात आहे. तुमचे हे जेवण तुमच्या पर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉईजची सर्वात मोठी भूमिका आहे. हे डिलिव्हरी बॉय रेस्टॉरंटमधून जेवण तुमच्या घरी आणतात. दिवसभर उन्हा तान्हात फिरणारे हे डिलिव्हरी बॉईज किती कमावतात माहिती आहे ? नाही ना. त्यांच्या कमाईचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे.
काही दिवसांपूर्वी फुल डिस्क्लोजर नावाच्या यूट्यूब चॅनलने अशाच काही डिलिव्हरी बॉईजशी विविध विषयांवर चर्चा केली होती. या चर्चेत त्यांचा पगार किंवा कमाईचा मुद्दा समोर आला. जेव्हा त्यांनी त्यांच्या कामईचा आकडा सांगितला तेव्हा आजूबाजूला उभ्या असलेल्यांना मोठा धक्का बसला. डिलिव्हरी बॉय दिवसाला किती कमावतो असा प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिले. साधारण दिवसात १५००-२००० डिलिव्हरी बॉय सहज कमावतो. तर एका आठवड्यात १० ते 2 हजार रुपये निश्चित मिळतात. त्यांची महिन्याला ४० ते ५० हजार रुपये कमाई नक्की होते, असे डिलिव्हरी बॉयने उत्तर देतांना संगितले. त्यांच्या या उत्तराने अनेकांना धक्का बसला आहे.
त्यांच्या या कमाईबाबत सत्यता पटावी म्हणून त्याने फोनवरून कमाईचा पुरावाही दिला. आणखी एका डिलिव्हरी बॉयने सांगितले की, ऑर्डर देतांना मिळालेल्या टिप्समधून गे दरमहा ५ हजार रुपयांच्या आसपास कमाई करतात. पावसाळ्यात डिलिव्हरी केल्यास थोडी रक्कम जास्त मिळते. विशेष म्हणजे अनेक प्लॅटफॉर्मवर रक्कम आधीच ठरलेली असते. जर डिलिव्हरी लांब अंतरावर केली जात असेल तर त्याचे शुल्क हे जास्त आकारले जाते.
मुलाखत पाहिल्याबरोबर इंटरनेटवर डिलिव्हरी बोईजच्या कमाईची चर्चा सुरू झाली. या बाबत एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देतांना म्हटले की, डिलिव्हरी बॉईजही इतके पैसे कमावतात. मलाही आता बाइक विकत घ्यावीशी वाटते. तर एकाने लिहिले की या सारखा जॉब करण्यास मजा येईल. तर एकाने सरकारी जॉबच्या मागे न लगता हा जॉब केला तर चांगली कमाई होईल असे म्हटले आहे.
संबंधित बातम्या