Mutual funds : एसआयपी हे एक साधन आहे, ज्यामध्ये दरमहा छोट्या बचतीची गुंतवणूक करता येते. तुमच्याजवळ डेली एसआयपीचीही सुविधा आहे. म्हणजेच तुम्ही दररोज गुंतवणूक करू शकता. किमान १०० रुपये गुंतवणूक करुनही एसआयपीची सुरुवात करता येते..
म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे जलद गुंतवणूक येत आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये, एसआयपीमध्ये सलग ५ व्या महिन्यात १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. एसआयपीतील गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी कायम ठेवल्यास गुंतवणूकदारांना चक्रवाढीचा प्रचंड फायदा होतो.
इक्विटी म्युच्युअल फंडांच्या अनेक योजनांनी गेल्या १० वर्षांत जास्तीत जास्त वार्षिक परतावा दिला आहे. एसआयपीच्या माध्यमातून दरमहा छोट्या बचतीची गुंतवणूक करता येते. आजच्या काळात डेली एसआयपीचीही सुविधा आहे. म्हणजेच तुम्ही दररोज गुंतवणूक करू शकतात. किमान १००रुपयांपासून एसआयपीत गुंतवणूक सुरू करता येते. त्यामुळे जर तुम्ही १० वर्षांत १ कोटी रुपयांचे कॉर्पस करण्याचे लक्ष्य ठेवले असेल, तर तुम्हाला मासिक किती गुंतवणूक करावी लागेल हे समजून घेऊ.
१० वर्षात १ कोटींचा फंड
म्युच्युअल फंड एसआयपीच्या अशा अनेक योजना आहेत, ज्यांचा परतावा गेल्या १० वर्षांमध्ये २०% किंवा त्याहून अधिक आहे. साधारणपणे, दीर्घ मुदतीत एसआयपीचा सरासरी वार्षिक परतावा १२% असू शकतो. अशाप्रकारे, एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर तुम्ही दर महिन्याला ४५ हजार रुपयांची एसआयपी करत असाल, तर तुम्ही १२% वार्षिक परताव्यानुसार रु. १,०४,५५, २५८ चा फंड बनवू शकतात. यामध्ये तुमची गुंतवणूक ५४,००,००० रुपये असेल आणि अपेक्षित परतावा ५०,,५५,२५८ रुपये असेल.
ही गोष्ट ठेवा ध्यानात
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये परताव्याची हमी नसते. त्याचा परतावा बाजाराच्या हालचालीवर अवलंबून असतो. म्हणजेच, जर बाजार वाढला किंवा पडला तर त्याप्रमाणे तुमच्या फंडाची कामगिरी होईल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेच्या आधारावरच गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
संबंधित बातम्या