मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Honor Days Sale: २०० मेगापिक्सलचा 5G स्मार्टफोन ११ हजारांनी स्वस्त, मिळणार तगडे फीचर्स!

Honor Days Sale: २०० मेगापिक्सलचा 5G स्मार्टफोन ११ हजारांनी स्वस्त, मिळणार तगडे फीचर्स!

Jan 05, 2024 03:15 PM IST

Honor 90 5G: ऑनर डे सेलअंतर्गत ग्राहकांना ऑनर कंपनीचे अनेक स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.S

Honor 90 5G
Honor 90 5G (Honor)

Smartphones Under 30000: ज्या ग्राहकांना शक्तिशाली कॅमेरा असलेला नवीन फोन घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी नवीन वर्ष आनंदाची भेट घेऊन आले. चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी ऑनरने गेल्या वर्षी भारतात ऑनर ९० 5G स्मार्टफोनसह पुनरागमन केले. या फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा प्रामरी कॅमेरा मिळत आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर ११ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑनर सेल आजपासून सुरू झाला आहे, जो १० जानेवारीपर्यंत असेल. यादरम्यान, फोनच्या खरेदीवर अनेक ऑफर उपलब्ध आहेत. ऑनर ९० 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ३००० हजारांचे प्लॅट डिस्काऊंट दिले जात आहे. याशिवाय, आयसीआयसी, एसबीआय आणि एचडीएफसी बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास ३००० हजार रुपयांचे अतिरिक्त सूट मिळत आहे. याचबरोबर जुन्या फोनच्या बदल्यात ग्राहकांना ५००० हजारांची सूट मिळत आहे.हा फोन १२ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट इएमआयवर खरेदी करता येईल.

या स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला. या फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फीसाठी ५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला. फोनच्या १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन एमराल्ड ग्रीन, डायमंड सिल्व्हर आणि मिडनाईट ब्लॅक अशा तीन रंगात बाजारात उपलब्ध आहे. फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता बॅटरी मिळत आहे, जे ६६ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel
विभाग