200 Megapixel Phone: स्वस्तात मिळतोय २०० मेगापिक्सल असलेला 5G फोन!-honor 90 5g priced around rs 20 000 is one of the best deals during amazon sale ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  200 Megapixel Phone: स्वस्तात मिळतोय २०० मेगापिक्सल असलेला 5G फोन!

200 Megapixel Phone: स्वस्तात मिळतोय २०० मेगापिक्सल असलेला 5G फोन!

Mar 31, 2024 11:47 PM IST

Honor 90 5G Price: ऑनर ९० 5G स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना मोठी सवलत मिळत आहे.

अ‍ॅमेझॉनवर ऑनर ९० स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना भरघोस सूट देत आहे.
अ‍ॅमेझॉनवर ऑनर ९० स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना भरघोस सूट देत आहे. (Honor)

Amazon sale: २०० मेगापिक्सलचा कॅमेऱ्या असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. ऑनर कंपनीचा नुकताच लॉन्च झालेल्या ी खरेदीवर तगडं डिस्काऊंट दिले जात आहे. या फोनमध्ये कॅमेऱ्यासह अनेक आकर्षित फीचर्स मिळत आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने तीन रंगात हा स्मार्टफोन बाजारात दाखल केला होता. नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

हा फोन लॉन्च करताना कंपनीने सांगितले होते की, या फोनला भारतात दोन वर्षांपर्यंत अॅन्ड्राईड अपडेट आणि तीन वर्षापर्यंत सेक्युरिटी अपटेड मिळेल. भारतात ऑनर ९० 5G च्या ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंट असलेल्या फोनची किंमत ३७ हजर ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत३९ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन डायमंड सिल्व्हर, एमराल्ड ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक अशा तीन रंगामध्ये लॉन्च केला होता.

अ‍ॅमेझॉनवर ऑनर ९० 5G (८ जीबी + २५६ जीबी) २७ हजार ९९९ रुपयांना आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंट असलेला फोन २९ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे. या फोनच्या खरेदीवर एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक धारकांना ३००० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. म्हणजेच ग्राहकांना हा फोन कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.

लॉचिन्गपूर्वी सॅमसंग गॅलेक्सी एम ५५ स्मार्टफोनमधील फीचर्स लीक!

या फोनमध्ये ग्राहकांना ६.७ इचाचा डिस्प्ले मिळत आहे. डोळ्यांच्या सुरक्षतेसाठी फोनमध्ये आय कम्फर्ट डिस्प्ले मिळत आहे. हा फोन ८ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह बाजारात दाखल झाला होता. हा फोन अॅन्ड्राईड १३ ओएसवर आधारित काम करतो. या फोनची खासियत म्हणजे, ज्यात २०० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह १२ मेगापिक्सेल लेन्स आणि मॅक्रो लेन्ससह २ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. या फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेल्या बॅटरीचा समावेश आहे.

विभाग