मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Honor 200: डीएसएलआरसारखा कॅमेरा, एआय फीचर्स आणि स्टायलिश लूकसह येतोय ऑनरचा 'हा' फोन!

Honor 200: डीएसएलआरसारखा कॅमेरा, एआय फीचर्स आणि स्टायलिश लूकसह येतोय ऑनरचा 'हा' फोन!

Jul 01, 2024 08:04 PM IST

Honor 200 Series: ऑनर २०० आणि ऑनर २०० प्रो फोन आता लवकरच भारतीय बाजारात दाखल होतोय. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एआय फीचर्स मिळत आहेत.

Honor 200
Honor 200

Honor 200 and Honor 200 Pro India Launch Confirmed: ऑनर २०० आणि ऑनर २०० प्रो फोन आता लवकरच भारतात लॉन्च होणार आहेत. मात्र, हा फोन भारतात कधी लॉन्च होईल, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.  परंतु, हा फोन  त्याआधी अ‍ॅमेझॉनने आपल्या मायक्रोसाइटवर साइटवरील डिव्हाइसेसची यादी केली आहे. लिस्टिंगमध्ये हा फोन कमिंग सून टॅगसह दाखवण्यात आला आहे.

ऑनर २०० स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ प्रोसेसरवर चालतो, तर प्रो व्हर्जनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ चिपसेट आहे. दोन्ही फोनमध्ये ओएलईडी फुल-एचडी+ स्क्रीन, १०० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार २०० एमएएच बॅटरी आणि ५० मेगापिक्सलट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

ऑनर २०० आणि ऑनर २०० प्रोचे लँडिंग पेज सध्या अ‍ॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह आहे. वेबसाइटवर स्मार्टफोन्सच्या लॉन्चिंगची नेमकी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु, ऑनर २०० सीरिज 'लवकरच येत आहे' या टॅगसह लिस्ट करण्यात आले आहे. इच्छुक ग्राहक लॉन्चबद्दल नवीनतम अपडेट्स मिळविण्यासाठी ऑनलाइन मार्केटप्लेसवरील "नोटिफाई मी" बटणावर क्लिक करू शकतात. लिस्टिंगमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5G कनेक्टिव्हिटीसह ऑनर २०० सीरिजचे रियर डिझाइन दाखवण्यात आले आहे.

किंमत

ब्रिटनमध्ये ऑनर २०० ची किंमत ४९९.९९ पाउंड (अंदाजे ५३ हजार ५०० रुपये) आहे. तर, ऑनर २०० प्रोची किंमत ६९९.99 पाउंड (अंदाजे ७४ हजार ८०० रुपये) आहे.

फिचर्स

ऑनर २०० आणि ऑनर २०० प्रो अँड्रॉइड १४ वर आधारित मॅजिकओएस ८.० वर चालतात आणि फुल-एचडी+ (१,२२४×२,७०० पिक्सेल) स्क्रीन आहेत. प्रो मॉडेलमध्ये ६.७८ डिस्प्ले आहे आणि स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ चिपसेटवर चालतो. व्हॅनिला मॉडेलमध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून स्नॅपड्रॅगन ७ जेन ३ चिप देण्यात आली आहे.

कॅमेरा

दोन्ही फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल मॅक्रो कॅमेरा आहे. यात ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ही देण्यात आला आहे.

बॅटरी

ऑनर २०० आणि ऑनर २०० प्रो या दोन्ही स्मार्टफोनमध्ये १०० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. प्रो मॉडेल ६६ वॅट वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

WhatsApp channel