Honda CB350: होंडाची जबरदस्त बाइक बाजारात दाखल; आता बुलेटला देणार टक्कर-honda cb 350 launched in india at rupees 2 lakh ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Honda CB350: होंडाची जबरदस्त बाइक बाजारात दाखल; आता बुलेटला देणार टक्कर

Honda CB350: होंडाची जबरदस्त बाइक बाजारात दाखल; आता बुलेटला देणार टक्कर

Nov 18, 2023 05:23 PM IST

Honda CB350 ही क्लासिक बाइक नुकतीच बाजारात दाखल झाली असून दीर्घकाळापासून वर्चस्व राखणाऱ्या रॉयल एनफिल्डलच्या बाइक्सना टक्कर देणार आहे.

Honda CB350 launches in India
Honda CB350 launches in India

भारतात दुचाकी बाजारपेठेत सध्या रेट्रो मोटरसायकलची हवा आहे. रॉयल एनफिल्डच्या बुलेटने तरुणाईला भुरळ पाडल्यानंतर या प्रकारच्या बाइकची बाजारात जबरदस्त विक्री होतेय. रेट्रो बाइकचे आकर्षण सतत वाढत चालले आहे. ग्राहकांच्या बदललेल्या आवडीनिवडीनुसार त्यांच्या पसंतीनुसार रचना केलेली अशा प्रकारची नवी दुचाकी होंडा कंपनीने नुकतीच लॉंच केली आहे. Honda CB350 ही क्लासिक बाइक नुकतीच बाजारात दाखल झाली असून दीर्घकाळापासून वर्चस्व राखणाऱ्या रॉयल एनफिल्डलच्या बाइक्सना टक्कर देणार आहे. नव्याने बाजारात दाखल झालेल्या Honda CB350 या बाइकची किंमत दोन लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

होंडा कंपनीने CB350 बाइकची शैलीपूर्ण रचना केली आहे. यामध्ये ऑल-LED लाइटिंग सिस्टीमद्वारे स्टाइलिंग गुणांक आणखी वाढवण्यात आला आहे. या नव्या बाइकमध्ये गोल आकाराचे एलईडी हेडलॅम्प, एलईडी विंकर्स आणि एलईडी टेल लॅम्पचा समावेश आहे. शिवाय स्प्लिट सीटसह फ्रंट फॉर्क्ससाठी मेटॅलिक कव्हर्स देखील आहेत. हे कव्हर्स बाइकला अस्सल क्लासिक अपील देतात. CB350 ही होंडाची दुचाकी मेटॅलिक आणि मॅट शेड्स रंगासह एकूण पाच विविध आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. यात रेड मेटॅलिक, पर्ल ब्लॅक, मॅट क्रस्ट मेटॅलिक, मॅट मार्शल ग्रीन मेटॅलिक आणि मॅट ड्यून ब्राउन रंगांचा समावेश आहे.

CB350 बाइकममध्ये डिजिटल अॅनालॉग इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे. हे क्लस्टर 'होंडा स्मार्टफोन व्हॉइस कंट्रोल सिस्टम (HSVCS) सोबत जोडले असून त्यातून दुचाकीस्वाराला वेळोवेळी वेग, इंधन क्षमता इत्यादींबाबत माहिती मिळते. या बाइकमध्ये आणीबाणीच्या प्रसंगी वाहन थांबवण्याची सूचना देणारी यंत्रणा असून बाइकच्या मागे लावलेले दिवे चमकवून मागून येणाऱ्या वाहनांना अचानक ब्रेक लावण्याची सूचना देऊ शकतात.

CB350 या दुचाकीमध्ये मोठे आणि शक्तिशाली असे ३४८.३६ सीसीची क्षमता असलेले, एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, सिंगल-सिलेंडर BSVI OBD2-B अनुरूप PGM-FI इंजिन आहे. या मोटर बाइक मध्ये ५५०० RPM वर १५.५ kW पॉवर आणि ३००० RPM वर २९.४ Nm टॉर्क, ५-स्पीड गिअरबॉक्सचा समावेश आहे.

भारतीय बाजारपेठेत होंडा कंपनीची CB350 ही बाइक रॉयल एनफील्ड कंपनीची क्लासिक 350 आणि बुलेट 350 ला टक्कर देईल, असं जाणकारांचं म्हणण आहे.

संबंधित बातम्या

विभाग