Feature Phone: फीचर फोनमध्ये अँड्रॉईडसारख्या सुविधा; एचएमडीचे २ फोन लॉन्च, किंमत फक्त २५०० रुपये!-hmd 105 4g and hmd 110 4g feature phones launched with upi and youtube ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Feature Phone: फीचर फोनमध्ये अँड्रॉईडसारख्या सुविधा; एचएमडीचे २ फोन लॉन्च, किंमत फक्त २५०० रुपये!

Feature Phone: फीचर फोनमध्ये अँड्रॉईडसारख्या सुविधा; एचएमडीचे २ फोन लॉन्च, किंमत फक्त २५०० रुपये!

Sep 11, 2024 06:06 PM IST

HMD Feature Phone Launched: एचएमडी कंपनीने एचएमडी १०५ 4G आणि एचएमडी ११० 4G हे दोन नवीन फीचर फोन लॉन्च केले आहेत.

एचएमडी कंपनीचे दोन नवीन फीचर फोन लॉन्च
एचएमडी कंपनीचे दोन नवीन फीचर फोन लॉन्च

HMD 105 4G and HMD 110 4G Lanched: एचएमडीने आपले दोन नवीन फीचर फोन एचएमडी १०५ ४ जी आणि एचएमडी ११० ४ जी भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. कंपनी या फोनला एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे. नवीन फीचर फोन यूपीआय आणि यूट्यूबसारख्या उत्तम फीचर्सने सुसज्ज आहेत. एचएमडी १०५ ४जीची किंमत २ हजार १९९ रुपये आहे. तर, एचएमडी ११० 4G साठी ग्राहकांना २ हजार ३९९ रुपये खर्च करावे लागतील. रिटेल स्टोअर्सव्यतिरिक्त तुम्ही ई-कॉमर्स साइट्स आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून हे फोन खरेदी करू शकतात.

एचएमडीचे हे नवे फोन अत्यंत स्वस्त फीचर फोनमध्ये स्मार्टफोन फीचर्स हव्या असलेल्या युजर्ससाठी बेस्ट आहेत. या फोनमध्ये तुम्ही क्लाऊड फोन अ‍ॅपद्वारे यूट्यूब म्युझिक आणि यूट्यूब शॉर्ट्स अ‍ॅक्सेस करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या फोनमध्ये युट्यूब आणि यूपीआय फीचर देण्यात आले आहेत. ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवता येणार आहे. या फोनची डिझाईनही उत्तम आहे.

कंपनीने या फोनमध्ये १ हजार ४५० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली. ग्राहकांना या फोनमध्ये मनोरंजनासाठी एमपी ३ प्लेयर आणि वायरलेस एफएम रेडिओ देखील मिळेल. याशिवाय, या फोनमध्ये फोन टॉकर आणि ३२ जीबी एसडीकार्ड सपोर्ट देखील देण्यात आला आहे. एचएमडीचे नवीन 4G फीचर फोन १३ इनपुट लँग्वेज आणि २३ लँग्वेज रेंडरिंग सपोर्टसह येतात. एचएमडी १०५ 4G कंपनीने ब्लॅक, सायन आणि पिंक या तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे. तर, ११० 4G टायटॅनियम आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येते. एचएमडी या डिव्हाइसेसला युजर्सच्या मनःशांतीसाठी पूर्ण एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी देत आहे.

१०० वॅट चार्जिंगसह वनप्लस फोनवर मोठी सूट

अ‍ॅमेझॉनवर सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स फेस्टिव्हल सेल आज संपणार आहे. अशा परिस्थितीत तुम्ही वनप्लस फोन मोठ्या सवलतीसह खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता उशीर करू नका. इलेक्ट्रॉनिक्स फेस्टिव्ह सेलच्या शेवटच्या दिवशी वनप्लस नॉर्ड ४ स्मार्टफोनवर बंपर डील मिळत आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २९ हजार ९९८ रुपये आहे. फोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेचे कार्ड वापरल्यास तुम्हाला २ हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट मिळेल.या फोनवर १५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये या फोनची किंमत २० हजार २५० रुपयांपर्यंत कमी करू शकतात. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट आपल्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Whats_app_banner
विभाग