Hindenburg Research Shut Down : अदानी समूहाला हादरवून सोडणाऱ्या अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्ट सेलिंग कंपनीचं 'दुकान' अखेर बंद होत आहे. कंपनीचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी या बाबत बुधवारी घोषणा केली. त्यांनी एक्सवर पोस्ट करत कंपनी बंद करत असल्याचं जाहीर केलं. हिंडेनबर्गच्या संस्थापकाने भावनिक पोस्टलिहीत आपला प्रवास, संघर्ष आणि यशाबद्दल देखील सांगितलं. अँडरसनने नोटमध्ये लिहिलं की, "आम्ही ज्या कल्पनांवर काम करत होतो त्या पूर्ण झाल्यानंतर कंपनी बंद करण्याची योजना होती. आज तो दिवस आला आहे. असे पोस्टमध्ये म्हटलं आहे.
हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी भावनिक पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल, संघर्षांबद्दल आणि यशांबद्दल सांगितले. पोस्टनुसार गेल्या वर्षाच्या अखेरीस, मी माझ्या कुटुंबाला, मित्रांना आणि आमच्या टीमला सांगितले होते की मी हिंडेनबर्ग रिसर्च बंद करण्याचा निर्णय घेत आहे. आम्ही आखलेल्या कल्पना पूर्ण झाल्यानंतर, आता कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे. त्यांनी लिहिले की जेव्हा मी हे काम सुरू केले तेव्हा मला शंका होती की मी ते काम करण्यास सक्षम आहे की नाही? माझ्याकडे पारंपारिक आर्थिक पार्श्वभूमी नव्हती. तसेच या क्षेत्रात माझे कोणी नातेवाईक देखी नाहीत. मी एका सरकारी शाळेत शिकलो. मी हुशार सेल्समन नाही. मला योग्य कपडे कसे घालावे हे देखील देखील माहित नव्हते. मी गोल्फ खेळू शकत नव्हतो. मी काही असा अतिमानव नाहीये जो चार तास झोपून जगू शकेल. मी माझ्या बहुतेक नोकऱ्यांमध्ये एक चांगला कर्मचारी होतो, पण बहुतेकदा माझ्याकडे दुर्लक्ष केले जात असे.
२०१७ मध्ये स्थापनेपासून हिंडेनबर्ग रिसर्चने उद्योग जगतातील फसवणूक, भ्रष्टाचार आणि गैरकारभार उघडकीस आणला आहे. कंपनीच्या यशाबद्दल अँडरसन म्हणाले, "आम्ही काही उद्योग हादरवून टाकली ज्यांची आम्हाला गरज वाटली. अदानी समूह त्यापैकीच एक होता. हिंडेनबर्गला आर्थिक तपासाचे पॉवरहाऊस बनविण्याचे श्रेय ते आपले कुटुंबीय, मित्र आणि ११ जणांच्या समर्पित टीमला देतात.
४० वर्षीय अँडरसनने यांनी जानेवारी २०२३ मध्ये गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर हेराफेरी, फसवणुकीचा आरोप करणारा अहवाल प्रसिद्ध करून जगाला हादरवून सोडले होते. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार गौतम अदानी त्यावेळी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते.
अँडरसनने डोर्सी यांच्या ब्लॉक इंक आणि इकॉनच्या इकान एंटरप्रायजेसवर अहवाल देखील प्रकाशित केला होता. त्यावेळी गौतम अदानी म्हणाले की, अदानी समूहाविरोधात हिंडेनबर्ग संशोधन अहवाल केवळ अदानी समूहाला अस्थिर करण्यासाठी नाही, तर भारताला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, त्या वर्षी या तिघांच्या एकत्रित संपत्तीला ९९ अब्ज डॉलरचा फटका बसला. तर, त्यांच्या सार्वजनिक व्यापार करणाऱ्या कंपन्यांचे मार्केट कॅप १७३ अब्ज डॉलरने घटले.
हिंडेनबर्ग बंद करण्याचा निर्णय हा अत्यंत वैयक्तिक निर्णय असल्याचं म्हटलं आहे. अँडरसन म्हणाले, "पुढील सहा महिन्यांत, मी आमच्या मॉडेलच्या प्रत्येक पैलूबाबत व आम्ही आमचे काम कसे करतो याबद्दल ओपन-सोर्स सामग्री व व्हिडिओंवर काम करण्याची योजना आखत आहोत. "
संबंधित बातम्या