Adani Group stocks : हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा झटका! ९० रुपयांपर्यंत खाली आला अदानीच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडं आहे का?-hindenburg research effect this adani share huge down price under 90 rupees ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Adani Group stocks : हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा झटका! ९० रुपयांपर्यंत खाली आला अदानीच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Adani Group stocks : हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा झटका! ९० रुपयांपर्यंत खाली आला अदानीच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Aug 13, 2024 12:34 PM IST

Sanghi Industries Ltd Share price : हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर सोमवारी अदानी ग्रुपच्या बहुतांश शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. त्याचा फटका सांघी इंडस्ट्रीज या शेअरलाही बसला.

हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा झटका! ९० रुपयांपर्यंत खाली आला अदानीच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडं आहे का?
हिंडेनबर्गच्या रिपोर्टचा झटका! ९० रुपयांपर्यंत खाली आला अदानीच्या कंपनीचा शेअर, तुमच्याकडं आहे का?

Sanghi Industries Ltd Share price : अमेरिकन रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर सोमवारी अदानी ग्रुपच्या बहुतांश शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. याचा परिणाम अदानी समूहाची कंपनी सांघी इंडस्ट्रीज लिमिटेडवरही झाला असून, कंपनीचा शेअर आज ३ टक्क्यांनी घसरून ८९.६५ रुपयांवर पोहोचला आहे.

शुक्रवारी शेअर मार्केट बंद झाले तेव्हा कंपनीचा शेअर ९२.१३ रुपयांवर स्थिरावला होता. सांघी इंडस्ट्रीजच्या शेअरची ५२ आठवड्यांतील उच्चांकी किंमत १५६.२० रुपये आहे. १५ जानेवारी २०२४ रोजी हा शेअर उच्चांकी पातळीवर होता. तर, २० मार्च २०२४ रोजी हा शेअर ८३ रुपयांवर बंद झाला. तर, मंगळवारी या शेअरमध्ये किंचित वाढ झाली असून तो ९० रुपयांवर व्यवहार करत आहे.

कोणाकडे किती शेअर?

संघी इंडस्ट्रीजमध्ये प्रवर्तकांचा ७५ टक्के आणि सर्वसामान्य भागधारकांचा २५ टक्के हिस्सा आहे. प्रवर्तकांमध्ये अंबुजा सिमेंटचा ५८.०८ टक्के हिस्सा आहे. एसझेडएफ प्रायव्हेट लिमिटेडकडं २.६६ टक्के हिस्सा आहे. सांघी इंडस्ट्रीजनंही नुकतेच जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला ८८.८२ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे.

अदानी समूहाच्या १० पैकी ८ कंपन्यांचे समभाग सोमवारी घसरणीसह बंद झाले. अदानी विल्मरचा शेअर ४ टक्क्यांनी घसरला. अदानी विल्मर ४.१४ टक्के, अदानी टोटल गॅस ३.८८ टक्के, अदानी एनर्जी सोल्युशन्स ३.७० टक्के, एनडीटीव्ही ३.०८ टक्के, अदानी पोर्ट्स २.०२ टक्के, अदानी एंटरप्रायझेस १.०९ टक्के, एसीसी ०.९७ टक्के आणि अदानी पॉवर ०.६५ टक्क्यांनी घसरले. अंबुजा सिमेंट्स ०.५५ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी ०.२२ टक्क्यांनी वधारले.

काय आहे हिंडेनबर्गच्या नव्या अहवालात?

हिंडेनबर्गनं शनिवारी उशिरा प्रसिद्ध केलेल्या नवीन शेअर बाजार नियामक सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धबल बुच यांच्यावर आरोप केले आहेत. या दोघांची अदानी समूहाशी मिलिभगत असल्याचा दावा हिंडेनबर्गनं केला आहे. बर्म्युडा आणि मॉरिशसमधील अज्ञात परदेशी फंडांमध्ये बुच दाम्पत्याची अघोषित गुंतवणूक आहे. विनोद अदानी यांनी याच फंडाचा वापर फंड लाँडरिंग आणि समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमती वाढवण्यासाठी केल्याचा आरोप आहे. विनोद अदानी हे अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे मोठे बंधू आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

विभाग