मराठी बातम्या  /  business  /  हिंडेनबर्गचा मोठा धमाका, जॅक डोर्सी यांच्या कंपनीवर फसवणुकीचे आरोप, ब्लॉक इंकचे शेयर्स घसरले!
Hindenburg Reaserch On Jack Dorsey
Hindenburg Reaserch On Jack Dorsey (HT)

हिंडेनबर्गचा मोठा धमाका, जॅक डोर्सी यांच्या कंपनीवर फसवणुकीचे आरोप, ब्लॉक इंकचे शेयर्स घसरले!

23 March 2023, 22:53 ISTAtik Sikandar Shaikh

Hindenburg Reaserch : गौदम अदानी यांच्यानंतर आता हिंडेनबर्ग रिसर्चने ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांना लक्ष्य केलं आहे.

Hindenburg Reaserch On Jack Dorsey : गौतम अदानी यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केल्यानंतर आता अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्चनं मोर्चा ट्वीटरचे माजी सीईओ जॅक डोर्सी यांच्याकडे वळवला आहे. त्यामुळं आता डोर्सी यांच्या कंपनीचे शेयर्स कोसळण्यास सुरुवात झाली असून भांडवली बाजारात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. हिंडेनबर्गने सादर केलेल्या नव्या रिपोर्टमध्ये जॅक डोर्सी यांच्या मालकीची कंपनी ब्लॉक इंकवर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळं आता गौतम अदानी यांच्यानंतर जॅक डोर्सी हे हिंडेनबर्गच्या निशाण्यावर आले आहेत. हिंडेनबर्गने ब्लॉक इंगवर धक्कादायक आरोप केले असून त्याबाबतची सर्व माहिती सार्वजनिक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

हिंडेनबर्गने सादर केलेल्या नव्या अहवालात जॅक डोर्सी यांच्या ब्लॉक इंक या कंपनीनं युजर्स वाढवून दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर कंपनीच्या शेयर्समध्ये तब्बल १८ टक्क्यांची घसरण झाली आहे. दोन वर्षांच्या तपासानंतर ब्लॉक इंकबद्दलीच माहिती सार्वजनिक करण्यात आली असून त्यात कंपनीनं तंत्रज्ञानांच्या माध्यमातून मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला आहे. कंपनीतील ४० ते ४५ टक्के खाती बनावट असून सर्व खाती एकाच व्यक्तीशी संबंधित आहे, सत्य माहिती लपवून जॅक डोर्सी यांच्या कंपनीनं गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही हिंडेनबर्गने केला आहे. त्यामुळ हिंडेनबर्गच्या रिपोर्ट्सचे पडसाद अमेरिकेसह जगभरात उमटण्याची शक्यता आहे.

जॅक डोर्सी यांच्या आधी हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचे व नियमांना तिलांजली देत नफा कमावल्याचे आरोप केले होते. त्यानंतर अदानी समुहाच्या शेयर्समध्ये ऐतिहासिक घसरण झाली होती. त्यावरून भारतात मोठं राजकीय वादंगही पेटलं होतं. त्यानंतर आता अदानी समुहाच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टानं एक समिती स्थापन केली आहे. कोर्टानं दोन महिन्यांच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश सेबीला जारी केले आहेत.