मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Hidenburg report : हिंडेनबर्ग पुन्हा धमाका करणार; आणखी एक रिपोर्ट येतोय! आता कोणावर नेम?

Hidenburg report : हिंडेनबर्ग पुन्हा धमाका करणार; आणखी एक रिपोर्ट येतोय! आता कोणावर नेम?

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 23, 2023 11:41 AM IST

Hidenburg report : शाॅर्ट सेलिंग हिडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समुहाची स्थिती बिघडवली. अदानी समुह यासंदर्भात कायम स्पष्टीकरण देत राहिला पण शेअर्समधील घसरण थांबवू शकला नाही.

Hidenburg report HT
Hidenburg report HT

Hidenburg report : अदानी समुहावर हिडेनबर्गचा बाँम्ब फुटला. गौतम अदानींच्या साम्राज्याला सुरुंगच लागला. हिडेनबर्गने आता अजून एक रिपोर्ट आणण्याची तयारी सुरु केली आहे. हिडेनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर शेअर बाजारात अदानी समुहाचे शेअर्स निम्म्यापेक्षा अधिक घसरले. ज्यामुळे समुहाला कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागले.

२३ जानेवारीला अदानी समुहाच्या शेअर्समध्ये चांगली वाढ झाली. अदानी समुहाच्या या रेकाॅर्ड ब्रेक स्पीडला २४ जानेवारीला खीळ बसली. शाॅर्ट सेलिंग कंपनी हिडेनबर्गच्या एका रिपोर्टने अदानी साम्राज्य खालसा करण्याचा प्रयत्न केला. गौतम अदानींची संपत्ती सप्टेंबर २०२२ मध्ये १५० अब्ज डाॅलर्स होती. या रिपोर्टनंतर केवळ ५३ अब्ज डाॅलर्सपर्यंत घसरली. या रिपोर्टनंतर अदानी समुह फोर्ब्समध्ये अब्जाधीशांच्या यादीत ३५ व्या स्थानी घसरला.

अदानी समुहावर अहवालाचा अटॅक केल्यानंतर हिडेनबर्गचे लक्ष्य कोणत्या कंपनीवर आहे याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. २३ मार्चला कंपनीने ट्विटरवर लिहिले आहे की, एक नवा रिपोर्ट लवकरच... हे ट्विट अशावेळी आले आहे जेंव्हा अमेरिकेच्या बँकेची स्थिती खराब आहे. त्यामुळे या रिपोर्टनंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

हिडेनबर्गच्या या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका भारतीयाने लिहिले आहे की, आशा करतो की यात आता कोणतीही भारतीय कंपनी नसेल. चीनी कंपनीवर एखादा रिपोर्ट तयार करा. हिडेनबर्गच्या अहवालाला आधारभूत मानून काँग्रेससहित तमाम विरोधी पक्षांनी जेपीसीची मागणी केली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या