Hindenburg Report: : गेल्या वर्षी अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे जगभरातील उद्योगविश्वात खळबळ उडाली होती. हिंअनेक गंभीर आरोप अदाणी समूहावर केले होते. याचा गंभीर परिणाम कंपनीच्या शेअर्सवर झाला होता. दरम्यान, आज हिंडनबर्ग रिसर्चने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पुन्हा एकदा भारतीय कंपनीबाबत मोठा खुलासा करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता अदाणी नंतर कोंन ? या चर्चांना उधाण आलं आहे.
गेल्या वर्षी २४ जानेवारीमध्ये हिंडेनबर्गने सादर केलेल्या अहवालात भारतीय शेअर बाजारावर मोठा परिणाम झाला होता. हिंडेनबर्गने अदानी समूहावर मोठा आरोप केला होता, त्यामुळे समूह कंपन्यांच्या शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले होते. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओ जाहीर होणार असतांना हा अहवाल समोर आल्यावर अदानी समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य ८६ अब्ज डॉलरने कमी झाले होते. याशिवाय अदानी समूहाच्या परदेशातील रोख्यांवरही परिमाण झाला होता.
बाजार नियामक संस्था सेबीने अदानी व हिंडेनबर्ग प्रकरणात नवा खुलासा केला आहे. मार्क किंग्डन आणि हिंडेनबर्ग यांच्यातील संबंधांवर सेबीने न्यूयॉर्कच्या हेज फंड व्यवस्थापकाला मोठी माहिती दिली आहे. सेबीने म्हटलं आहे की हिंडेनबर्गने अहवाल सार्वजनिक करण्यापूर्वी दोन महिने मार्क किंग्डन यांच्यासोबत तो शेअर करण्यात आला होता. त्यामुळे धोरणात्मक ट्रेडिंगमधून मोठ्या प्रमाणात नफा कमावला गेला.
सेबीने जारी केलेल्या तब्बल ४६ पानी कारणे दाखवा नोटीसमध्ये म्हटले आहे की हिंडेनबर्ग आणि किंग्डन कॅपिटल मॅनेजमेंटने मे २०२१ मध्ये संशोधन करार केला होता. या करारानुसार, जानेवारी २०२३ मध्ये अंतिम अहवाल प्रकाशित होण्यापूर्वी मसुदा अहवाल दोघांमध्ये हस्तांतरित करण्यात आला होता.
कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट लिमिटेडमध्ये भागभांडवल असलेल्या किंग्डन कॅपिटलने जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या गोंधळादरम्यान मोठा नफा कमावला होता, असे सेबीच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या अहवालानुसार, किंगडन कॅपिटलने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडमध्ये शॉर्ट पोझिशन घेण्यासाठी तब्बल ४३ दशलक्ष डोलर्सची रक्कम हस्तांतरित केली होती. यानंतर कंपनीने यातून तब्बल २२. २५ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली.
२४ जानेवारी २०२३ रोजी जाहिर करण्यात आलेल्या हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे शेअर्स ३४२२ रुपयांवरून १४०४.८५ रुपयांपर्यंत घसरले. कंपनीच्या समभागांची किंमत ५९ टक्क्यांनी घसरली होती. सेबीला त्यांच्या तपासणीत आढळून आले आहे की किंगडनच्या नियंत्रणाखाली असलेल्या के इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडाने अहवाल प्रकाशित होण्याच्या काही काळ आधी ट्रेडिंग करण्यास सुरूवात केली होती. तसेच या अहवालामुळे अदानी कंपनीचे शेअर्स पडले तेव्हा त्यांना मोठा फायदा झाला.
त्याच वेळी, किंग्डन कॅपिटलने आपला बचाव करतांना म्हटलं की कायदेशीररित्या ते असा करार करू शकतात. तसेच, अहवाल सार्वजनिक होण्यापूर्वी प्राप्त करून त्यावर कारवाई करण्याची परवानगी देखील आहे. कोटक महिंद्रा बँकेने किंग्डन आणि हिंडेनबर्ग यांच्यातील संबंध नाकारले आहेत.