Stock Market : बीएसएनएलकडून मिळालं २५०१ कोटींचं काम; रडतखडत चाललेल्या शेअरनं बदलली चाल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : बीएसएनएलकडून मिळालं २५०१ कोटींचं काम; रडतखडत चाललेल्या शेअरनं बदलली चाल!

Stock Market : बीएसएनएलकडून मिळालं २५०१ कोटींचं काम; रडतखडत चाललेल्या शेअरनं बदलली चाल!

Jan 17, 2025 02:52 PM IST

HFCL Share Price : बीएसएनएलकडून तब्बल २५०१ कोटींचं कंत्राट मिळाल्यानं एचएफसीएल या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी आली आहे.

BSNL कडून मिळालं २५०१ कोटींचं काम; रडतखडत चालणाऱ्या शेअरनं बदलली चाल!
BSNL कडून मिळालं २५०१ कोटींचं काम; रडतखडत चालणाऱ्या शेअरनं बदलली चाल!

Stock Market News : हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड अर्थात एचएफसीएल या कंपनीच्या शेअरमध्ये आज तेजी पाहायला मिळाली. बीएसईवर हा शेअर १०५.४५ रुपयांवर उघडला. दिवसभरात कंपनीचा शेअर ४.२९ टक्क्यांनी वधारून १०६.८० रुपयांवर पोहोचला. बीएसएनएलकडून कंपनीला मिळालेलं २५०१ कोटी रुपयांचं कंत्राट या तेजीचं कारण ठरलं आहे.

भारत नेट फेज-३ च्या पंजाब टेलिकॉम सर्कलमध्ये कंपनीनं २,५०१.३० कोटी रुपयांचं काम मिळवलं आहे. कंपनीला इथं मिडल माइल नेटवर्क डिझाइन, सप्लाय, कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलेशन, अपग्रेडेशन, ऑपरेशन अँड मेंटेनन्सचं काम मिळालं आहे. हे काम ३ वर्षात पूर्ण करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर या प्रकल्पाच्या देखभालीचं काम १० वर्षे पहावं लागणार आहे. 

काय करते ही कंपनी?

हिमाचल फ्युचरिस्टिक कम्युनिकेशन्स लिमिटेड (HFCL) टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्सचे डिझाइनिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग करते. याशिवाय ऑप्टिकल फायबर आणि ऑप्टिकल फायबर केबलचं मॅन्युफॅक्चरिंग, डिझायनिंगचं कामही कंपनी करते. कंपनी इनडोअर आणि आउटडोअर वाय-फाय अ‍ॅक्सेस पॉइंट्स, स्विच, राउटर आणि रेडिओ रिले देखील तयार करते.

शेअर बाजारात कशी आहे कंपनीची कामगिरी?

शेअर बाजारात एचएफसीएलची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही. गेल्या महिनाभरात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत ६ महिन्यांत १४ टक्क्यांची घसरण झाली आहे. मात्र गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चांगली बाब म्हणजे सर्व अडचणी असूनही हा शेअर १ वर्षात २० टक्क्यांहून अधिक परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. या काळात सेन्सेक्स ७.३५ टक्क्यांनी वधारला आहे.

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक १७१ रुपये आहे. तर, ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ८१.२२ रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप १४,९४६ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner