Dividend Stock : हिरो मोटोकॉर्प देणार एका शेअरवर १०० रुपये डिविडंड, तुम्हालाही मिळणार का?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend Stock : हिरो मोटोकॉर्प देणार एका शेअरवर १०० रुपये डिविडंड, तुम्हालाही मिळणार का?

Dividend Stock : हिरो मोटोकॉर्प देणार एका शेअरवर १०० रुपये डिविडंड, तुम्हालाही मिळणार का?

HT Marathi Desk HT Marathi
Published Feb 12, 2025 11:14 AM IST

Hero Motocorp Dividend News : वाहन उद्योगातील प्रमुक कंपनी हिरो मोटोकॉर्पनं तिमाही निकालानंतर मोठ्या डिविडंडची घोषणा केली आहे.

हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! तब्बल ५००० टक्के लाभांशांची घोषणा, एका शेअरवर किती रुपये मिळणार? पाहा!
हिरो मोटोकॉर्पचा मोठा धमाका! तब्बल ५००० टक्के लाभांशांची घोषणा, एका शेअरवर किती रुपये मिळणार? पाहा!

Share Market News : हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान चर्चेत होते. आज कंपनी खास डिव्हिडंड देत आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे समभाग बुधवारी एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करत आहेत. 

दुचाकी कंपनीच्या संचालक मंडळानं ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या कालावधीच्या तिमाही निकालांसह कंपनीच्या पात्र भागधारकांना प्रति शेअर ५,००० टक्के म्हणजेच १०० रुपये इतका भरघोस लाभांश जाहीर केला होता. आज कंपनीचा शेअर २.१५ टक्क्यांनी घसरून ३९९७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १०० रुपये प्रति इक्विटी समभाग अंकित मूल्य असेल, असं कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळानं अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशानं सभासदांची पात्रता ठरविण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली होती. येत्या ८ मार्च पर्यंत लाभांशाची रक्कम गुंतवणूकदारांच्या खात्यावर जमा होणं अपेक्षित आहे.

कसा होता तिमाही निकाल?

३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १२ टक्क्यांनी वाढून १२०३ कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत वाहन कंपनीनं १०,२११ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे.  यात वार्षिक आधारावर ५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तिमाहीत एबिटडा ८.४ टक्क्यांनी वाढून १,४७६ कोटी रुपयांवर पोहोचला, तर मार्जिन ५० बेसिस पॉईंटनं वाढून १४.५ टक्क्यांवर पोहोचलं आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

हिरो मोटोकॉर्पचा शेअर सप्टेंबर २०२४ मधील ५२ आठवड्यांच्या उच्चांकी ६२४५ रुपयांवरून जवळपास ३५ टक्क्यांनी घसरला आहे.  मागच्या सहा महिन्यांत हा शेअर २४.७४ टक्क्यांनी घसरला आहे. तर, मागच्या वर्षभरात गुंतवणूकदारांना सुमारे १५ टक्क्यांचा तोटा झाला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner