मराठी बातम्या  /  Business  /  Heavy Penalty Will Be Imposed For Giving Wrong Information For Exemption Of Tds

TDS : टीडीएसमध्ये सवलत मिळवण्याठी चुकीची माहिती दिल्यास पडेल जबरदस्त भुर्दंड

TDS HT
TDS HT
Kulkarni Rutuja Sudeep • HT Marathi
Apr 20, 2023 01:58 PM IST

TDS : गेल्या एका वर्षात व्याजदरातील वाढीमुळे लोकांनी आपला कल मुदत ठेवींकडे वळवला आहे. बचत खात्यांवर मिळणारे वार्षिक व्याज समजा १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर बँक त्यावर कर कपात करते.

TDS : गेल्या एका वर्षात व्याजदरातील वाढीमुळे लोकांचा कल मुदत ठेवींकडे वाढलाआहे. बचत खात्यांवर मिळणारे वार्षिक व्याज समजा १० हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर बँक उत्पन्नाच्या स्त्रोतावर कर कपात म्हणजे टीडीएस कापते. याचप्रमाणात एफडीवर छोट्या किंवा दीर्घ मुदत ठेवींवर होणाऱ्या नफ्यावरही टीडीएस कापला जातो. जर तुम्हाला तुमच्या एफडीवर कोणत्याही प्रकारची करकपात नको असेल तर फाॅर्म १५ जी अथवा १५ एच हा सर्वात चांगला पर्याय आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच फाॅर्म १५ जी अथवा १५ एच भरुन टीडीएस पासून आपला बचाव करता येतो. मात्र फाॅर्म १५ मध्ये चूकीची माहिती भरल्यास भुर्दंड भरावा लागतो. किंबहुना, गंभीर प्रकरणांमध्ये जेलची हवादेखील खावी लागू शकते. त्यावर्षी कमावलेल्या उत्पन्नावर करदात्यांना अधिकाधिक व्याज भरावे लागेल. फाॅर्म १२ बीबीए दाखल करुन तुम्ही आयकर रिटर्न्स दाखल करण्यापासून सूट मिळवण्याचा दावाही करु शकतात.ल

कोणती व्यक्ती भरु शकते हा फाॅर्म

ज्या लोकांचे वार्षिक उत्पन्न करमर्यादेच्या अंतर्गत आहे, ते लोक हा फाॅर्म भरु शकतात. अशा करदात्यांना पॅनकार्डसह फाॅर्म १५ जी अथवा १५ एचसह घोषणापत्र सादर करावे लागेल. टीडीएस कपात होण्यापूर्वी अर्ज सादर करा. कर निर्धारण अधिकाऱ्याचा आदेश केवळ एका वर्षांसाठी असतो. पुढील वर्षी नवे अर्ज सादर करावे लागेल. अर्जाची छाननी आणि आदेश जारी करेपर्यंत ३० ते ४५ दिवस लागतात.

फाॅर्म १५ जी आणि १५ एच मध्ये अंतर

आयकराच्या कलमामध्ये करदात्यांना व्याज, लाभांश, भाडे, विमा कमिशनवर टीडीएस कपातीमुळे सवलत मिळते. फाॅर्म १५ जी आणि १५ एचमध्ये त्याचा खुलासा करावा लागतो. फाॅर्म १५ जी ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना आणि अविभाजित हिंदू कुटूंबांसाठी असतो. ज्येष्ठ नागरिकांना १५ एच भरावा लागतो. सेवानिवृत्त झालेल्या लोकांना हा फाॅर्म भरणे अनिवार्य आहे. हा फाॅर्म तुम्ही ई हस्तांतरणाद्वारे अथवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन भरावा लागले.

त्यानंतरही कर कपात झाली तर काय करावे

फाॅर्म १५ जी अथवा फाॅर्म १५ एच जमा केल्यानंतरही जर तुमचे उत्पन्न कर मर्यादेच्या अंतर्गत येत असेल त्याची आगाऊ माहिती बँक अथवा वित्तीय संस्थेला द्याली. त्यासह फाॅर्म मागे घ्यावा लागेल. त्यानंतर टीडीएस सुरु होईल. जे लोक हा फाॅर्म भरण्यात दिरंगाई करतात, ते आयकर रिटर्न्स दाखल करण्याच्या वेळी टीडीएससाठी दावा करु शकतात आणि रिफंड मागू शकतात.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग