मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC Bank : १६ हजार कोटींचा निव्वळ नफा होऊनही शेअर गडगडला, असं कसं झालं?

HDFC Bank : १६ हजार कोटींचा निव्वळ नफा होऊनही शेअर गडगडला, असं कसं झालं?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 17, 2024 12:19 PM IST

hdfc bank share Price Today : तब्बल १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा होऊनही एचडीएफसी बँकेचा शेअर आज ७ टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे.

HDFC Bank Share Price
HDFC Bank Share Price

hdfc bank share Price Today : देशातील सर्वात मोठी खासगी बँक एचडीएफसीचे शेअर्स आज तब्बल ७ टक्क्यांनी कोसळले आहेत. आजच्या मोठ्या घसरणीमुळं बँकेचं बाजार भांडवल तब्बल ७७ हजार कोटींनी घटलं आहे. एचडीएफसीचा शेअर सध्या एनएसईवर १५६०.९० रुपयांवर ट्रेड करत आहे.

डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत बँकेच्या नफ्यात तब्बल ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यानंतरही बँकेच्या शेअरमध्ये ही तीव्र घसरण झाली आहे. बँकेनं डिसेंबरच्या तिमाहीत १६३७२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. असं असतानाही शेअर घसरल्यानं गुंतवणूकदारांमध्ये काहीशी चलबिचल आहे.

पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त होणार; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

ब्रोकरेज हाऊसेसना काय वाटतं?

आघाडीचे ब्रोकरेज हाऊसेस CLSA आणि मॉर्गन स्टॅनले यांनी बँकेच्या कर्जातील वाढ आणि लिक्विडिटी कव्हरेज रेशिओमध्ये (LCR) झालेल्या घसरणीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र, CLSA नं बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवलं आहे. तर, मॉर्गन स्टॅन्लेनं शेअर्सना ओवरवेट दिलं आहे. 

देशांतर्गत ब्रोकरेज हाऊस कोटक इक्विटीजनं बँकेच्या अंदाजित कमाईमध्ये कपात दर्शवली आहे. मात्र, बँकेच्या शेअर्सवर खरेदीचं रेटिंग कायम ठेवलं आहे. ब्रोकरेज हाऊस नुवामानं एचडीएफसी बँकेचं रेटिंग कमी केल्याचं इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

Union Budget 2024 : कसा तयार होतो केंद्रीय अर्थसंकल्प?; जाणून घेऊया सोप्या शब्दांत

नफ्यात मोठी वाढ

चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत HDFC बँकेचा निव्वळ नफा ३४ टक्क्यांनी वाढून १६३७२ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत खासगी क्षेत्रातील या आघाडीच्या बँकेनं १२,२५९ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. डिसेंबर २०२३ च्या तिमाहीत बँकेचं निव्वळ व्याज उत्पन्न (NII) वाढून २८,४७१ कोटी रुपये झालं आहे. मागील तिमाहीत हेच उत्पन्न २७,३८५ कोटी होतं. चालू आर्थिक वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत एचडीएफसी बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) १.२६ टक्क्यांवर पोहोचली आहे. मागील वर्षी याच कालावधीत हे प्रमाण १.२३ टक्के इतकं होतं.

 

(डिस्क्लेमर : वरील लेख केवळ माहितीपर असून त्यातील मते तज्ज्ञांची स्वत:ची आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग