HDFC Downtime : एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC Downtime : एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

HDFC Downtime : एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे!

Jul 12, 2024 01:33 PM IST

HDFC Bank Downtime : बँकेतील सिस्टिमच्या अपग्रेडेशनसाठी एचडीएफसी बँकेच्या काही सेवा उद्या बंद राहणार आहेत. काय आहे नेमकी वेळ? जाणून घेऊया…

एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे
एचडीएफसी बँकेचे खातेदार आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे (Reuters)

HDFC Bank Downtime : खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या १३ जुलै रोजी, म्हणजेच उद्या एचडीएफसी बँकेची सिस्टिम अपग्रेड केली जाणार आहे. त्यामुळं या कालावधीत बँकेच्या काही सेवा बंद राहणार आहेत.

दैनंदिन कामकाजाचा वेग वाढावा व ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी या उद्देशानं सिस्टिम अपग्रेड केली जात आहे. अपग्रेडेशनचा हा कालावधी शनिवारी पहाटे ३.०० वाजल्यापासून सुरू होईल आणि त्याच दिवशी दुपारी ४.३० वाजता संपेल. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या सुट्टीच्या दिवशी हे काम करण्याचा निर्णय बँक व्यवस्थापनानं घेतला आहे.

ग्राहकांच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारात कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत पुरेशी रक्कम काढून ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सर्व फंड ट्रान्सफरचे आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला देखील बँकेनं दिला आहे. बँकेच्या डाउनटाइम विषयी अधिक माहिती एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटवर मिळू शकते. तसंच, कस्टमर केअरकडूनही माहिती मिळवता येईल.

एचडीएफसीच्या डाउनटाइम दरम्यान कोणत्या सेवा उपलब्ध नसतील?

एचडीएफसीच्या डाउनटाइम दरम्यान कॅश डिपॉझिट, फंड ट्रान्सफर, मिनी स्टेटमेंट, इन्क्वायरी / बिल-पे सेवा आणि कार्डलेस कॅश विड्रॉल उपलब्ध होणार नाही.

नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग : सिस्टीम अपग्रेड होत असताना या सेवा उपलब्ध असतील.

फंड ट्रान्सफर : आयएमपीएस, एनईएफटी, आरटीजीएस, एचडीएफसी बँक अकाउंट-टू-अकाउंट ऑनलाइन ट्रान्सफर आणि ब्रँच ट्रान्सफरसह सर्व ट्रान्सफर सेवा देखील अपग्रेड कालावधीत उपलब्ध नसतील.

डाऊनटाइम म्हणजे काय?

निरंतर सेवा एखादी सिस्टिम अनेकदा आकस्मिक किंवा नियोजित कारणासाठी बंद ठेवली जाते. ज्या विशिष्ट कालावधीसाठी ही सिस्टिम बंद ठेवली जाते, त्या कालावधीला डाऊनटाइम असं म्हणतात. बहुतेक वेळा हा डाऊनटाइम देखभाल-दुरुस्ती किंवा अपग्रेडेशनसाठी घेतला जातो. ग्राहकांच्या दृष्टीनं डाऊनटाइम हा तात्कालीक अडचणीचा असला तरी दीर्घकाळात तो उपयुक्त असतो. त्यामुळं ग्राहकांना सध्या मिळणारी सेवा अधिक चांगली होण्याची शक्यता असते.

Whats_app_banner