HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; येत्या १ ऑगस्टपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; येत्या १ ऑगस्टपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार

HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; येत्या १ ऑगस्टपासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलणार

Jul 29, 2024 07:50 PM IST

HDFC Bank Credit Card Rules Changed: एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून येत्या १ ऑगस्ट २०२४ पासून क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांत बदल होणार आहे.

येत्य १ ऑगस्टपासून एचडीएफसी क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांत बदल
येत्य १ ऑगस्टपासून एचडीएफसी क्रेडिट कार्डशी संबंधित नियमांत बदल

HDFC Bank Credit Card Rules: ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच १ ऑगस्टपासून फायनान्सशी संबंधित अनेक नियमात बदल होणार आहे. यातील एका बदलाचा फटका एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डधारकांना बसू शकतो. बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना आता थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व  रेंटल व्यवहारांवर एक टक्के रक्कम आकारली जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी कमाल मर्यादा तीन हजार रुपये असणार आहे. पेटीएम, क्रेड, मोबिक्विक सारख्या थर्ड पार्टी पेमेंट अ‍ॅप्सचा वापर करून रेंटल व्यवहार करता येतात.

युटिलिटी ट्रान्झॅक्शनबद्दल बोलायचे झाले तर ५० हजारांपेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांसाठी १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. प्रत्येक व्यवहारासाठी तीन हजाराची मर्यादा आहे. मात्र, विमा व्यवहारांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

इंधन व्यवहार:

इंधन व्यवहारांबद्दल बोलायचे झाले तर १५००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १ टक्के शुल्क आकारले जाईल. याखालील व्यवहारांसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. अशा व्यवहारांची कमाल मर्यादा ३,००० रुपये प्रति व्यवहार आहे. क्रेड, पेटीएम आदी थर्ड पार्टी अ‍ॅप्सद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर एज्युकेशन ट्रान्झॅक्शनवर १ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. 

प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजारांची मर्यादा

प्रत्येक व्यवहारासाठी ३ हजारांची मर्यादा आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय शिक्षण देयके या शुल्कातून वगळण्यात आली आहेत. त्याचबरोबर क्रेडिट किंवा कॅशबॅकवर रिवॉर्ड रिडीम करणाऱ्या ग्राहकांकडून ५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. त्याचप्रमाणे रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट सुविधा वापरणाऱ्या ग्राहकांना दरमहा ३.७५ टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. हे व्यवहाराच्या तारखेपासून थकित रक्कम पूर्ण पणे अदा होईपर्यंत लागू राहील.

ईएमआय प्रोसेसिंग फी:

कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन स्टोअरमध्ये ईएसई-ईएमआय पर्यायाचा लाभ घेण्यासाठी 299 रुपयांपर्यंत ईएमआय प्रोसेसिंग फी भरावी लागेल. याशिवाय एचडीएफसी बँकेने टाटा न्यू इन्फिनिटी आणि टाटा न्यू प्लस क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल केला आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी अटी आणि शुल्काबाबत काही महत्त्वाचे बदल केले आहेत, जे येत्या १ ऑगस्ट २०२४ पासून लागू होणार आहेत.

Whats_app_banner