HBD Financial Services : एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये अनलिस्टेड मार्केटमध्ये बरीच उलथापालथ दिसून येत आहे. या कंपनीनं आयपीओसाठी सेबीकडं अर्ज केला आहे. त्यानंतर अनलिस्टेड मार्केटमध्ये शेअर तेजीत आला आहे. एचडीबी ही एचडीएफसी बँकेची उपकंपनी आहे.
ऑक्टोबर महिन्यात एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसनं आयपीओसाठी अर्ज केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर अनलिस्टेड मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. गेल्या काही दिवसांत पुन्हा या शेअरमध्ये घसरण झाली असली तरी शेअरची किंमत अद्यापही १००० रुपयांच्या पुढे आहे.
मनी कंट्रोलच्या अहवालानुसार, सध्या अनलिस्टेड मार्केटमध्ये एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर १२९५ रुपयांवर ट्रेड करत आहे. २० ऑक्टोबर रोजी तो १४५० रुपयांवर व्यवहार करत होता.
कंपनीनं आयपीओ आणण्यामागे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा निर्णय आहे. रिझर्व्ह बँकेनं एनबीएफसीला ऑक्टोबर २०२२ मध्ये ३ वर्षांच्या आत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याचे निर्देश दिले होते. एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस एचडीएफसी बँकेची उपकंपनी राहणार आहे.
आयपीओच्या माध्यमातून कंपनी १२,५०० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार एचडीबी फायनान्सचं मूल्यांकन ७८ ते ८७ हजार कोटी रुपये अपेक्षित आहे.
आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीच्या कर्जात १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यानंतर लोनबुकमधील आकडा ६६००० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कंपनीचा महसूल (ऑपरेशन्समधून) १४,१७१ कोटी रुपये होता. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा महसूल १२,४०२ कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२४ दरम्यान कंपनीचा नफा २४६० कोटी रुपये झाला आहे. एका आर्थिक वर्षात कंपनीचा नफा १९५९ कोटी रुपये झाला आहे.