जागतिक मागणीत घट झाल्याने देशातील हिऱ्यांचा साठा वाढला आहे. जगातील सर्वात मोठा नैसर्गिक हिऱ्यांचा उत्पादक व पॉलिश्ड हिऱ्यांचा सर्वात मोठा निर्यातदार असल्याचा दावा करणाऱ्या किरण जेम्सने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी १७ ते २७ ऑगस्ट दरम्यान ही सुट्टी जाहीर केली आहे.
द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, अमेरिकेने रशियन हिऱ्यांवर निर्बंध लादले आहे. २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धानंतर जी ७ देशांनी देखील रशियाच्या हिरे व्यवसायावर निर्बंध लादण्याची घोषणा केल्यानंतर भारातील हिरे उत्पादक विविध समस्यांना सामोरे जात आहेत.
किरण जेम्सचे अध्यक्ष वल्लभभाई लखानी म्हणाले, "सध्या हिरे उद्योग मोठ्या मंदीचा सामना करत आहेत. कारण जगभरात पॉलिश्ड हिऱ्यांना हवी तेवढी मागणी नाही. हिऱ्यांच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आम्ही १० दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे.
पॉलिश्ड हिऱ्यांच्या किमती जगभरात घसरल्या असून हिरे उत्पादकांना त्यांचा व्यवसाय चालवणे कठीण झाले आहे, असे ते म्हणाले. पुरवठा नियंत्रित राहिल्यास मागणी वाढेल आणि याचा फायदा उद्योगांना होईल.
दिवाळीच्या काळात हिरे कारखान्यांना सहसा दीर्घ सुट्ट्या दिल्या जातात. किरण जेम्स, १७००० कोटींची वार्षिक उलाढाल असलेली, जगातील आघाडीच्या हिरे कंपन्यांपैकी एक असलेल्या डी बियर्सच्या साइट धारकांपैकी एक आहे. डी बियर्सने याआधी पहिल्या तिमाहीच्या तुलनेत जूनमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत हिऱ्याच्या उत्पादनात १५ टक्के घट नोंदवली होती. याचे एक कारण म्हणजे "सामान्यपेक्षा जास्त" इन्व्हेंटरी म्हणून हीरे तयार केले गेले.
लखानी म्हणाले, "किरण फर्ममध्ये ५०,००० हून अधिक डायमंड पॉलिशर्स काम करतात. त्यापैकी ४०,००० नैसर्गिक हिरे कापतात व त्यांना पॉलिश करतात, तर १०,००० प्रयोगशाळेत विकसित डायमंड युनिटमध्ये काम करतात. आम्ही पॉलिशर्सना नुकसान भरपाई देण्याचा विचार करत आहोत. असा निर्णय जर एकत्रितपणे घेतल्यास हिऱ्यांचा उत्पादनावर नियंत्रण ठेवता येईल, त्यामुळे उद्योगाला मदत होईल, असे लखाणी म्हणाले.