केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेची ५३ वी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अर्थ्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आजच्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सौर कूकरवर १२ टक्के जीएसटी लावण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जीएसटी अधिनियमाच्या कलम ७३ अंतर्गत जारी केलेल्या डिमांड नोटिशीसाठी व्याज आणि दंड माफ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी नवी दिल्लीत ५३ व्या जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, गोवा आणि मेघालयचे मुख्यमंत्री, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश आणि ओडिशाचे उपमुख्यमंत्री तसेच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.