मराठी बातम्या  /  बिझनेस  /  wheat rice price : गहू, तांदळाच्या वाढत्या किंमतींनी टेन्शन वाढलं; सरकारनं घेतला मोठा निर्णय

wheat rice price : गहू, तांदळाच्या वाढत्या किंमतींनी टेन्शन वाढलं; सरकारनं घेतला मोठा निर्णय

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Aug 10, 2023 12:18 PM IST

wheat rice price : फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर अन्नधान्यांच्या किंमतींमध्ये तेजी निर्माण झाली. तर दुसरीकडे मान्सून आणि अवकाळीमुळेही परिणाम झाल्याने सरकारला हा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा लागला.

wheat and rice HT
wheat and rice HT

wheat rice price : सरकारने गहू आणि तांदुळाच्या वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचचले आहे. याअंतर्गत सरकारने अतिरिक्त ५० टन गहू आणि २५ लाख टन तांदुळाची खुल्या बाजारात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. खाद्य सचिव संजीव चोपडा यांनी बुधवारी ही माहिती दिली. ते म्हणाले, सध्या गहू आणि तांदुळाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी देशांतर्गत उपलब्धतेवर भर दिला जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीही अशीच १५ लाख टन गव्हाची तांदुळाच्या ५ लाख टनाची विक्री खुल्या बाजारात करण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

सरकारने तांदुळाचे आरक्षित मूल्य दोन रुपये प्रती किलोंनी घटवून ३१ रुपयांवरून ते २९ रुपये केले आहे. दरम्यान गव्हाचे मूल्य अपरिवर्तित ठेवण्यात आले आहे. कारण ओएमएसअंतर्गत व्यापाऱ्यांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे. एफसीआय २८ जूनपासून ई आॅक्शनच्या माध्यमातून खुल्या बाजारात गहू आणि तांदुळाची विक्री करत आहेत.

देशात मुबलक पुरवठा

देशात गहू आणि तांदुळाचा मुबलक पुरवठा आहे. एफसीआयजवळ बफर स्टाॅक्व्यतिरिक्त ८७ लाख टन गहू आणि २१७ लाख टन तांदुळाचा साठा उपलब्ध आहे.

या कारणामुळे वाढ

सरकारचा हा निर्णय़ फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर अन्नधान्याच्या किंमतींतील वाढीनंतर घेण्यात आला आहे. देशांतर्गत पातळीवर मान्सून आणि अवकाळीचाही परिणाम दिसून आला आहे. तांदुळ आणि गव्हाच्या किंमतीं जून पासून वाढायला लागल्या आहेत. देशांतर्गत पातळीवर २० टक्के उसळी पाहायला मिळाली आहे. देशातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या किंमतीत १८ टक्के वाढ झाली. ही गेल्या सहा महिन्यातील उच्चांकी पातळी आहे.

WhatsApp channel

विभाग