मराठी बातम्या  /  business  /  Electric Vehicles price hike : ईव्ही खरेदीपूर्वी इथे लक्ष द्या, येत्या १ जूनपासून ईव्ही होणार महाग
electric vehicles HT
electric vehicles HT

Electric Vehicles price hike : ईव्ही खरेदीपूर्वी इथे लक्ष द्या, येत्या १ जूनपासून ईव्ही होणार महाग

24 May 2023, 15:10 ISTKulkarni Rutuja Sudeep

Electric Vehicles price hike : ईव्ही खरेदीचा प्लान करत असाल तर १ जूनपूर्वी खरेदी करा. कारण येत्या १ जूनपासून ईव्हींच्या किंमतीत वाढ होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकींवरील अनुदान कमी केल्याने त्याचा बोजा थेट ग्राहकांच्या खिशावर पडताना दिसत आहे.

Electric Vehicles price hike : देशात मेक इन इंडिया अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. महागड्या डिझेल-पेट्रोलमुळे ग्राहकही इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांवर सरकार उत्पादक कंपन्यांना सबसिडी देते, ज्यामुळे ग्राहकांना थोड्या कमी किमतीत वाहन मिळते. परंतु, १ जून २०२३ पासून केंद्र सरकारने इलेक्ट्रिक टू व्हीलर सबसिडीला दिले जाणारे अनुदान कमी करण्याची घोषणा केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्र सरकारने १ जून २०२३ रोजी किंवा त्यानंतर नोंदणी केलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींना लागू असलेल्या फेम -II (फास्टर अॅडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स इन इंडिया) योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान कमी केले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने या बदलाबाबत अधिसूचना जारी केली आहे, ज्या अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी मागणी प्रोत्साहन म्हणून दिले जाणारे अनुदान १५,००० रुपये प्रति किलोवॅट तासावरून १०,००० रुपये प्रति किलोवॅट तास करण्यात आले आहे.

अलीकडेच, केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकींसाठी प्रोत्साहन मर्यादा ४० टक्क्यांवरून एक्स-फॅक्टरी किमतीच्या १५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे. इलेक्ट्रिक अँड हायब्रिड व्हेईकल्स (FAME) इंडिया योजना १ एप्रिल २०१९ रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी सुरू झाली होती, जी आणखी दोन वर्षांच्या कालावधीसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढवण्यात आली होती. याचा फायदा इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना होत होता, मात्र आता अनुदान कमी झाल्याचा बोजा थेट ग्राहकांच्या खिशावर पडताना दिसत आहे. दुचाकीची किंमत २५ ते ३५ हजार रुपयांनी महागण्याची शक्यता आहे.

१ जून पूर्वीच खरेदी करा ईव्ही

तुम्ही इलेक्ट्रिक टू-व्हीलर स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही १ जून २०२३ पूर्वी खरेदी करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कारण १ जूननंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमती वाढतील. कारण सबसिडी कमी केल्याने वाहन उत्पादक ग्राहकांकडून ती किंमत वसूल करतील. ही रक्कम आतापर्यंत सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात मिळत होती. अहवालानुसार, १ जूनपूर्वी दुचाकी खरेदी केल्यास ग्राहक अंदाजे २५,००० रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

विभाग