सर्वसामान्यांना मिळू शकते मोठी भेट, १०० वस्तूंवर जीएसटी कपात शक्य-govt may decrease gst from 100 goods common man mey get good news soon ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सर्वसामान्यांना मिळू शकते मोठी भेट, १०० वस्तूंवर जीएसटी कपात शक्य

सर्वसामान्यांना मिळू शकते मोठी भेट, १०० वस्तूंवर जीएसटी कपात शक्य

HT Marathi Desk HT Marathi
Sep 27, 2024 12:32 PM IST

१०० वस्तूंवरील जीएसटी मध्ये कपात करण्याचा निर्णय येत्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. मंत्रिगटाची बैठक २० ऑक्टोबररोजी होणार आहे.

जीएसटी रेड
जीएसटी रेड

जीएसटी स्लॅब : सर्वसामान्यांना सरकारकडून लवकरच मोठी भेट मिळू शकते. १०० वस्तूंवरील कराचा स्लॅब कमी करण्याचा विचार मंत्रिगट करत आहे. पश्चिम बंगालच्या अर्थमंत्री चंद्रिमा भट्टाचार्य यांनी गुरुवारी सांगितले की, मंत्रिगट काही वस्तूंवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणण्याचा विचार करीत आहे. बाटलीबंद पाणी आणि सायकलवरील जीएसटी स्लॅब मध्ये कपात होण्याची शक्यता आहे. मंत्रिगटाची पुढील बैठक २० ऑक्टोबररोजी होणार आहे.

बुधवारच्या बैठकीत मेडिकल आणि फार्मास्युटिकल वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याबाबत चर्चा झाली. सध्या ते १२ टक्क्यांच्या जीएसटी स्लॅबमध्ये येतात. या विषयावर पुढील चर्चा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत कपातीच्या नुकसानीबाबतही चर्चा झाली आहे. सोडा वॉटरसह काही उत्पादनांवरील जीएसटी वाढवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, बंगालच्या अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे की, सध्या जीएसटी कपातीमुळे होणारे महसुली नुकसान सरकार सहन करणार नाही.

भारतात सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. हे चार जीएसटी स्लॅब ५ टक्के, १२ टक्के, १८ टक्के आणि २८ टक्के आहेत. जीएसटी कायद्यानुसार कराचे दर ४० टक्क्यांपर्यंत वाढवले जाऊ शकतात. 2024 मध्ये जीएसटीचा सरासरी दर 11.56 टक्के करण्यात आला होता. जे १५.३ टक्के महसुली दरापेक्षा कमी आहे. बुधवारच्या बैठकीत यावरही चर्चा झाली.

बंगालच्या अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, काही खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. तर हेअर ड्रायर, ब्युटी प्रॉडक्ट्ससह इतर काही वस्तूंवरील जीएसटी चा दर 18 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.

Whats_app_banner