Website Ban : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद-government blocked more than 100 websites for connection with illegal investments and job fraud ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Website Ban : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद

Website Ban : ‘या’ कारणामुळे परदेशातून चालणाऱ्या १०० हून अधिक वेबसाईट केंद्र सरकारकडून बंद

Dec 06, 2023 10:56 PM IST

Government Blocked 100 Website : सरकारने बेकायदेशीर गुंतवणूक आणि पार्ट टाइम नोकरीची फसवणूक करणाऱ्या १०० वेबसाइट्सवर कारवाई करत या बॅन केल्या आहेत.

Government Blocked 100 Website
Government Blocked 100 Website

केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने १०० हून अधिक वेबसाइट ब्लॉक केल्या आहेत. या वेबसाइट्स आर्गनाइज्ड इन्वेस्टमेंट आणि टास्क-बेस्ड पार्ट-टाइम जॉब फ्रॉड करत असल्याचा आरोप होता. राष्ट्रीय सायबर क्राइम थ्रेट एनालिटिक्स यूनिट (NCTAU) ने मागच्या आठवड्यात या पोर्टल्सची तपासणी केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

गुंतवणूक आणि टास्क-आधारित अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीत गुंतलेल्या १०० वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आणि त्या ब्लॉक करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चा वापर करून या सर्व वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या.

अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, या वेबसाइट्स परदेशातून ऑपरेट केल्या जात होत्या. मोठ्या प्रमाणात करण्यात आर्थिक घोटाळे करून कार्ड नेटवर्क, क्रिप्टोकरन्सी फॉरेन एटीएम विड्रॉल आणि इंटरनेशनल फिनटेक कंपन्याचा वापर करून हे पैसे भारताबाहेर घेऊन गेल्या. या प्रकरणी हेल्पलाइन आणि नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. 

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने म्हटले की, आर्थिक फसवणुकीसाठी सामान्यपणे डिजिटल एडवर्टाइजमेंटचा वापर केला गेला. अनेक भाषांमध्ये घर बसल्या नोकरी व घर बसल्या पैसे कमवा आदी कीवर्डचा वापर करून गूगल आणि मेटा सारख्या  प्लेटफार्मवर लाँच केले जात होता. फ्रॉड करणाऱ्यांच्या निशाण्यावर निवृत्त कर्मचारी, महिला व बेरोजगार युवक असतात. 

केंद्र सरकारकडून गुंतवणूक आणि टास्क-आधारित अर्धवेळ नोकरीच्या फसवणुकीत गुंतलेल्या १०० वेबसाइट्सची ओळख पटवण्यात आली आणि त्या ब्लॉक करण्यात आल्या. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० चा वापर करून या सर्व वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या.

एका व्यक्तीला टेलिग्राम वर पार्ट टाईम जॉबसाठी मेसेज आला आणि त्याच्या खात्यातून लाखो रुपये लंपास झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरुमध्ये ही घटना घडली असून या व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ६१ लाख रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे.

Whats_app_banner