How to recover contacts: एक काळ असा होता, जेव्हा आपल्याला कुटुंबाचे आणि मित्रांचे फोन नंबर लक्षात किंवा लिहून ठेवावे ठेवायचो. परंतु, जेव्हापासून फोनमधील टेक्नोलॉजी विकसित होत गेली, तेव्हापासून आपण अनेक कामांसाठी फोनवर पूर्णपणे अवलंबून झालो आहोत. क्वचितच काही लोक असतील, जे एखाद्या व्यक्तीचा फोन नंबर लक्षात ठेवत असतील. आता एखाद्याला कॉल करायचा असेल तर नंबर शोधण्याऐवजी, तुम्ही थेट संपर्क यादीतून कोणालाही कॉल करू शकतात. परंतु, एखाद्या दिवशी अचानक सर्व फोन नंबर डिलीट झाले किंवा तुम्हाला फोन बदलावा लागला तर अनेक समस्या निर्माण होतात.
तुम्ही नवीन फोन घेततात. पण काही नंबर नंबर त्याच जुन्या फोनमध्ये राहतात. ज्यामुळे अनेक वेळा ते सर्व नंबर एक- एक करून सेव्ह करावे लागतात. परंतु, आज आपण गुगलच्या अशा सेटिंगबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे तुमचे सर्व संपर्क काही मिनिटातच तुमच्या फोनमध्ये ट्रान्सफर करू शकतात. ही खास सेटिंग तुमच्या फोनमध्येच दडलेली असते. या सेटिंगबद्दल जाणून घेऊयात.
- सर्वप्रथम फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट उघडा, जिथे तुमचे सर्व कॉन्टॅक्ट्स आहेत.
- यानंतर तुम्हाला तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
- येथे कॉन्टॅक्ट सेटिंगचा पर्याय निवडावा लागेल.
- यानंतर तुम्हाला Google Contact Sync सेटिंगवर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला ज्या खात्यातून बॅकअप घ्यायचा आहे, ते निवडा.
- यानंतर तुम्हाला दोन सेटिंग्ज दिसतील, तुम्हाला त्या चालू कराव्या लागतील.
- सर्वप्रथम तुम्हाला All Sync Device Contact चा पर्याय चालू करावा लागेल.
- दुसरे म्हणजे तुम्हाला Import SIM Contact च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- असे केल्याने तुमच्या जुन्या फोनचे मिस झालेले नंबरही नवीन फोनवर येतील.