गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि बरेच काही-google pixel 9 pro fold set to go on sale on september 4 check pricing offers availability and more ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि बरेच काही

गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध; जाणून घ्या किंमत, ऑफर्स आणि बरेच काही

Sep 03, 2024 10:40 PM IST

Google Pixel 9 Pro Fold: बहुप्रतीक्षित स्मार्टफोन गुगल पिक्सल ९ प्रो भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. उद्या दुपारी १२ वाजल्यापासून हा फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल.

गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध
गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्यापासून विक्रीसाठी उपलब्ध (Google Pixel)

बहुप्रतीक्षित स्मार्टफोन गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड उद्या दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. गुगलच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनचा भारतातील हा पहिलाच सेल इव्हेंट असणार आहे. या स्मार्टफोनवर ग्राहकांना बँक ऑफर्ससह अनेक ऑफर्स मिळणार आहेत.

नवीन गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड १ लाख ७२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.  हा फोन १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज इंटरनल मेमरी या सिंगल स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. पिक्सल ९ प्रो फोल्ड केवळ ऑब्सिडियन फिनिश कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, क्रोमा आणि रिलायन्स डिजिटल सह ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून खरेदी साठी उपलब्ध असेल. 

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी करताना ग्राहकांना अनेक बँक ऑफर्स आणि डिस्काऊंटचा लाभ घेता येईल. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवापरून पेमेंट केल्यास ११,००० रुपयांचा इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना १३ हजार ५०० रुपयांपर्यंत एक्स्चेंज बोनसदेखील मिळू शकतो. याशिवाय, हा स्मार्टफोन एका वर्षासाठी दरमहा १२ हजार ४५९ रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करता येणार आहे. 

गुगल पिक्सेल ९ प्रो फोल्ड: डिस्प्ले

नवीनतम  गुगल पिक्सेल 9 प्रो फोल्डमध्ये ६.३ इंचाचा अ‍ॅक्टुआ कव्हर डिस्प्ले आणि ८.० इंचाचा सुपर अ‍ॅक्टुआ इनर डिस्प्ले आहे. यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७०० निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. नवीन स्मार्टफोन गुगल टेन्सर जी ४ एसओसी चिपसेटवर चालतो आणि तो अँड्रॉइड १४ वर चालतो. गुगल सात वर्षांचे ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट ही देत आहे. 

गुगल पिक्सेल ९ प्रो फोल्ड: कॅमेरा

नवीन फोल्डेबल मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात ओआयएससह ४८ एमपी क्वाड पीडी मुख्य कॅमेरा, १०.५ एमपी अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि ५ एक्स ऑप्टिकल झूम क्षमता असलेला आणखी १०.८ एमपी टेलिफोटो कॅमेरा आहे. 

गुगल पिक्सेल ९ प्रो फोल्ड: बॅटरी

स्मार्टफोनच्या कव्हर आणि इनर डिस्प्लेमध्ये एफ/२.२  अपर्चर देणारा १० एमपी ड्युअल फ्रंट कॅमेरा आहे. नवीन पिक्सल ९ प्रो फोल्ड मध्ये ४ हजार ६५० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 

 

 

विभाग