Flipkart Black Friday Sale: प्रीमियम फोल्डेबल फोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सेलमध्ये गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड हा फोन १० हजार रुपयांचा फ्लॅट डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा फोन प्रीमियम बिल्ड-क्वालिटीव्यतिरिक्त शक्तिशाली कॅमेरा सेटअपसह येते.
फोल्डेबल डिव्हाइसेसचा मार्केट शेअर झपाट्याने वाढत असून गुगलने या ट्रेंडचा भाग बनून दमदार फीचर्ससह गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन डिस्प्ले आहेत, त्यापैकी प्रायमरी फोल्डेबल डिस्प्ले ८ इंचाचा स्क्रीन साईज देतो. याशिवाय, बाहेर ६ इंचापेक्षा मोठा कव्हर डिस्प्ले आहे, जेणेकरून तो स्टँडर्ड स्मार्टफोन म्हणून वापरता येईल.
गुगल पिक्सल ९ प्रो फोल्ड ला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर १ लाख ७२ हजार ९९९ रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आले आहे. हा फोन खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड वापर करणाऱ्या ग्राहकांना १० हजार रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास ५ टक्के कॅशबॅक दिला जात आहे. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना एक्स्चेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्स्चेंज ऑफर अंतर्गत ग्राहक ४९ हजार ५० रुपयांपर्यंत बचत करू शकतात. परंतु, एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट ग्राहकाच्या जुन्या फोनचे मॉडेल, आणि स्थितीवर अवलंबून असेल. निवडक मॉडेल्सवर १३,००० रुपयांचा एक्स्ट्रा एक्स्चेंज बोनस आहे. हा फोन ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
गुगलच्या फोल्डेबल फोनमध्ये ८ इंचाचा फोल्डेबल एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, एचडीआर १० प्लस आणि २७०० नाइट्सची पीक ब्राइटनेस सपोर्ट करतो. याशिवाय ६.३ इंचाचा कव्हर्ड ओएलईडी डिस्प्ले गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शन, एचडीआर सपोर्ट, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २७०० नाइट्सची पीक ब्राइटनेस सोबत येतो. यात १६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह गुगल टेन्सर जी४ प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, यात ट्रिपल कॅमेरा सेटअप सह १०.८ एमपी टेलिफोटो आणि १०.५ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सरसह ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा कॅमेरा आहे. यात १० मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि डिव्हाइसच्या ४ हजार ६५० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते, जी २१ वॅट वायर्ड आणि ७.५ वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.