मराठी बातम्या  /  बिझनेस  /  थर्मामीटरचं काम करणार हा स्मार्टफोन, कपाळ स्कॅन करून सांगणार अचूक तापमान

थर्मामीटरचं काम करणार हा स्मार्टफोन, कपाळ स्कॅन करून सांगणार अचूक तापमान

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 27, 2024 03:03 PM IST

Google Pixel 8 Pro Smartphone : गुगलने (Google) आपल्या Google Pixel 8 Pro या फोनमध्ये एक आकर्षक फीचर आणले आहे. या फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये तापमान मोजण्याचे टूल आहे.

Google Pixel 8 Pro Smartphone
Google Pixel 8 Pro Smartphone

आता तुमच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्हाला ताप आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी तुमचा मोबईल फोनच तुमची मदत करणार आहे.

गुगलने (Google) आपल्या Google Pixel 8 Pro या फोनमध्ये एक आकर्षक फीचर आणले आहे. या फीचरचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये तापमान मोजण्याचे टूल आहे. हे बॉडी टेम्परेचर टूल तुमच्या फोनला थर्मामीटरमध्ये बदलू शकते, याद्वारे तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान मोजू शकता.

दरम्यान, Pixel 8 Pro हा फोन २०२३ मध्ये लॉंच झाला होता, तेव्हा या मोबाईलच्या मागच्या बाजूस कॅमेरा बँडमध्ये एक फिजीकल थर्मामीटर होते. तेव्हा ते थर्मामीटर केवळ वस्तूंचे तापमान मोजण्यास सक्षम होते. पण आता या नव्या जानेवारी अपडेटनंतर हे थर्मामीटर शरीराचे तापमान मोजण्यासही सक्षम आहे.

बॉडी टेम्परेचर टूल कसं काम करते?

विशेष म्हणजे, गुगलने खूपच विचारपूर्वक हे फीचर डिझाइन केले आहे आणि या फीचरचे वर्णन "मेडिकल-ग्रेड" असे केले आहे. या फीचरला Pixel 8 Pro वर थर्मामीटर ॲपद्वारे एक्सेस केले जाऊ शकते.

शरीराचे तापमान मोजण्यासाठी, युजरला मोबाईल फोनद्वारे त्यांचे कपाळ स्कॅन करावे लागेल. मोबाईल थेट कपाळालाही स्पर्श करण्याची गरज नाही. त्याचा इन्फ्रारेड सेन्सर आणि कॅमेराचा LDAF रीडर ट्रिगर करण्यासाठी प्रॉक्सीमिटी अचूकपणे शोधू शकतो. यानंतर गुगल, युजर्सना तापमान थेट त्यांच्या फिटबीट प्रोफाइलमध्ये सेव्ह करण्याची अनुमती देते. हे इंटिग्रेशन हेल्थ मेट्रिक्सचा सहज मागोवा घेण्यासाठी आणि निरीक्षण करण्यासाठी एक सोयीस्कर मार्ग प्रदान करते.

दरम्यान, बॉडी टेम्परेचर टूल उत्तम साधन आहे. पण ते सर्वच मार्केटमध्ये उपलब्ध होऊ शकणार नाही. विशेषत: जेथे वेगवेगळ्या संस्थांना वैद्यकीय मान्यता आवश्यक असते. 

पण, या फोनमधील इतर बहुप्रतिक्षित फीचर्स, जसे “सर्कल टू सर्च,” “मॅजिक कंपोज” आणि “फोटोमोजी” हे  नियमित ओव्हर-द-एअर अपडेट्सचा भाग म्हणून ३१ जानेवारी रोजी रिलीज होण्याची अपेक्षा आहे.

फोनमध्ये मोठा डिस्प्ले आणि हेवी रॅम

Google Pixel 8 Pro हा स्मार्टफोन रॅम आणि स्टोरेजनुसार दोन प्रकारात येतो. त्याच्या १२GB + १२८GB व्हेरिएंटची किंमत १,०६,९९९ रुपये आहे. तर १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत १,१३,९९९ रुपये आहे.

फोनमध्ये ६.७-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले आहे. जो क्वाड एचडी प्लस रिझोल्यूशन (२९९२×१३४४ पिक्सेल), १-१२०Hz रिफ्रेश रेट, २४०० nits पीक ब्राइटनेस आणि गोरिला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शनसह येतो.

तसेच, हा स्मार्टफोन टायटॅनियम M2 चिपसह Google Tessar G3 प्रोसेसरने सुसज्ज आहे आणि तो Android Android १४ वर काम करतो.

कंपनी या फोनसाठी ७ वर्षांचा सॉफ्टवेअर सपोर्ट देईल. यात स्टँडर १२GB RAM आणि १२८GB/२५६GB स्टोरेज आहे.

कॅमेरा आणि बॅटरीदेखील दमदार

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ४८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि ४८-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फीसाठी, या फोनमध्ये १०.५ मेगापिक्सेल कॅमेरा आहे. 

फोनमध्ये ३०W फास्ट चार्जिंग, २३W Qi वायरलेस चार्जिंग सपोर्टसह ५०५० mAh बॅटरी आहे. 

सोबतच फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक देखील आहे. फोन USB-C पोर्ट आणि IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंगसह येतो. कंपनीने या फोन ऑब्सिडियन आणि ब्लॅक रंगात लॉन्च केला आहे.

WhatsApp channel

विभाग