Google Pay ची दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर! तब्बल १००१ रुपयांचा कॅशबॅक जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल ‘हे’ काम
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Google Pay ची दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर! तब्बल १००१ रुपयांचा कॅशबॅक जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Google Pay ची दिवाळीनिमित्त धमाकेदार ऑफर! तब्बल १००१ रुपयांचा कॅशबॅक जिंकण्याची संधी; फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Nov 01, 2024 07:54 AM IST

google pay cash back : पेमेंट अ‍ॅप गुगल पेवर सध्या सुरू असलेल्या स्पेशल कॅम्पेनमुळे युजर्संना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळत आहे. त्यासाठी त्यांना पेमेंटशी संबंधित काही बाबी पूर्ण कराव्या लागणार आहेत.

गुगल पे वापरणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी! १००१ रुपयांपर्यंत मिळणार कॅशबॅक; असा करा दावा
गुगल पे वापरणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी! १००१ रुपयांपर्यंत मिळणार कॅशबॅक; असा करा दावा

google pay cash back : लोकप्रिय ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म गुगल पेने दिवाळी निमित्त  एक विशेष ऑफर सुरू केली आहे.  या ऑफरद्वारे  वापरकर्ते तब्बल १००१ रुपयांचा कॅशबॅक जिंकू शकणार आहेत. या कॅशबॅकचा फायदा पुढील आठवडाभरात काही पेमेंट टास्क पूर्ण करणाऱ्या युजर्सना मिळणार आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या फन कॅम्पेनमध्ये युजर्सना लाडू गोळा करण्यास सांगितले जात असून, त्याद्वारे कॅशबॅक  दिले जाणार आहे. तर हे कॅशबॅक कसे मिळवावे याची माहिती घेऊयात.  

गुगल पेने आपल्या नव्या कॅम्पेनला लाडू असे नाव दिले आहे. अ‍ॅप उघडताच स्क्रीन बॅनरवर या बाबत माहिती दिली जात आहे.  विविध प्रकारचे ऑनलाइन पेमेंट करताना युजर्स एकूण ६ लाडू गोळा करू शकतात. जर तुम्ही रोज गुगल पेच्या मदतीने पेमेंट करत असाल तर तुम्ही त्याचा नक्कीच फायदा घ्यावा आणि  मोठा कॅशबॅक मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावा. गूगलपेने  म्हटले आहे की, या कॅम्पेनद्वारे युजर्संना ५१ रुपयांपासून १००१ रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.

कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण करावी लागेल हे सोपे टास्क 

नव्या कॅम्पेनसह गुगल पेमध्ये लाडू गोळा करण्यासाठी आणि कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणाऱ्या काही बाबीची यादी  तुम्ही खाली पाहू शकता.

- क्यूआर कोड स्कॅन करून यूपीआयद्वारे कोणत्याही दुकानात किंवा व्यापाऱ्यावर १०० रुपयांपेक्षा जास्त पैसे भरा.

- याशिवाय यूपीआयच्या माध्यमातून कोणत्याही प्रीपेड किंवा पोस्टपेड नंबरवर कमीत कमी १००  रुपयांचे रिचार्ज करा.

- प्लॅटफॉर्मवर यूपीआयच्या मदतीने निवडक कॅटेगरीमध्ये कमीत कमी १०० रुपयांचे बिल भरा.

- पार्टनर ब्रँडकडून किमान २०० रुपयांच्या गिफ्ट कार्डच्या खरेदीवरही लाडू मिळतात.

तुम्हाला हवं असेल तर गोळा केलेले लाडू तुम्ही तुमच्या मित्रांनाही भेट देऊ शकता. जेव्हा ते कॅशबॅकसाठी या लाडूचा दावा करतील तेव्हा तुम्हाला बोनस लाडू दिला जाईल. ६ वेगवेगळे लाडू गोळा केल्यानंतर तुम्ही  कॅशबॅक बक्षिसे जिंकू शकता. मात्र, त्यानंतर पुन्हा लाडू गोळा करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. या कॅशबॅक योजनेबद्दल  किंवा त्याच्या अटी व शर्तींबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असल्यास गुगल पे अ‍ॅपमध्ये दिसणाऱ्या बॅनरवर टॅप करू शकता.

Whats_app_banner