Google Gpay new feature : जीपे म्हणजेच गूगल पे वापरणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. कंपनीने ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ मध्ये यूपीआय ॲप गुगल पेच्या नवीन फीचरची घोषणा केली आहे. या नव्या फीचर्सच्या यादीमध्ये यूपीआय सर्कल, यूपीआय व्हाउचर, ईरूपी, क्लिक पे क्यु आर स्कॅन, प्रीपेड युटिलिटी पेमेंट आणि रुपे कार्ड्सवरून टॅप करा आणि पे करा यासह इतर अनेक फीचर्सचा यात समावेश आहे. कंपनीनुसार या वर्षाच्या अखेरीस वापरकर्त्यांना वरील फीचर्स उपलब्ध करून दिली जाणार आहे. गूगल पे च्या या नवीन फीचर बद्दल माहिती घेऊयात.
यूपीआय सर्कल हे एनपीसीआयचे एक नवीन फीचर आहे. या फीचरद्वारे बँक खाते नसलेल्या वापरकर्त्यांना देखील डिजिटल पेमेंटचा पर्याय मिळणार आहे. यासाठी वापरकर्त्यांना यूपीआय खाते वापरणारे मित्र आणि कुटुंबीय आवश्यक राहणार आहे. ज्यांचे बँक खाते किंवा Google Pay लिंक केलेले खाते नसेल अशा घरातील ज्येष्ठांसाठी हे फीचर उपयुक्त ठरणार आहे. यासाठी, Google Pay प्राथमिक वापरकर्त्याला आंशिक प्रतिनिधीत्व विशेषाधिकार देईल. यामध्ये, वापरकर्त्याला प्रत्येक व्यवहारास अनुमति द्यावी लागेल. त्याच वेळी, पूर्ण प्रतिनिधीमध्ये, वापरकर्ते १५००० रुपयांपर्यंत मासिक मर्यादा सेट करू शकतात.
UPI व्हाउचर eRupi हे थेट लाभ हस्तांतरण फीचर आहे. जे २०२१ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. आता गुगल पे वापरकर्ते देखील याचा वापर करू शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने, बँक खाते UPI शी लिंक केलेले नसले तरीही वापरकर्ते डिजिटल पेमेंटसाठी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवरून प्रीपेड व्हाउचर तयार करू शकणार आहेत. या फीचरसाठी गुगलने एनपीसीआय आणि वित्तीय सेवा विभागासोबत भागीदारी केली आहे.
हे बिल पेमेंटसाठी Google Pay मध्ये ऑफर केलेले एक नवीन वैशिष्ट्य आहे. हे वापरकर्त्यांना ॲपमध्ये क्युआर स्कॅन करून बिल पेमेंट करण्याचा पर्याय मिळणार आहे. यासाठी, बिलरला ग्राहकासाठी सानुकूलित क्युआर कोड तयार करणे आवश्यक आहे. याशिवाय, कंपनी ग्राहकांचा डेटा जोडल्यानंतर प्रीपेड युटिलिटी बिलांचे तपशील आणि पेमेंटपर्याय वापरकर्त्यांना दर्शवेल. हे Paytm मध्ये ऑफर केलेल्या वैशिष्ट्यांसारखेच आहे. NPCI Bharat Billpay च्या सहकार्याने गुगल हे फीचर ऑफर करणार आहे.
RuPay कार्डसह टॅप करा आणि पे हे वैशिष्ट्य या वर्षाच्या शेवटी Google Pay वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. वापरकर्ते त्यांचे RuPay कार्ड ॲपमध्ये जोडू शकतात आणि फोनवरील NFC द्वारे कार्ड मशीनवर टॅप करून पैसे देऊ शकतात. विशेष म्हणजे यामध्ये कार्डचे तपशीलही सेव्ह होणार नाहीत. त्याचप्रमाणे, कंपनी यूपीआय लाइटमध्ये देखील ऑटोपेचे वैशिष्ट्य दिले जाणार आहे. शिल्लक रक्कम निर्धारित रकमेपेक्षा कमी झाल्यास हे वैशिष्ट्य आपोआप वॉलेट टॉप अप करेल.