Google layoffs : गुगलमध्ये पुन्हा मोठी नोकर कपात..! CEO सुंदर पिचाई यांनी केला खुलासा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Google layoffs : गुगलमध्ये पुन्हा मोठी नोकर कपात..! CEO सुंदर पिचाई यांनी केला खुलासा

Google layoffs : गुगलमध्ये पुन्हा मोठी नोकर कपात..! CEO सुंदर पिचाई यांनी केला खुलासा

Dec 21, 2024 01:28 PM IST

Google Layoffs : प्रसिद्ध टेक कंपनी गुगलने गेल्या काही वर्षात अनेकदा नोकरकपात केली असून अनेक कामगारांना घरचा रस्ता दाखवला आहे. गेल्या काही वर्षांत गुगलच्या हजारो कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. आता सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितले आहे की, टॉप मॅनेजमेंटमध्ये १० टक्के कपात करण्यात आली आहे.

गुगल सीईओ सुंदर पिचाई
गुगल सीईओ सुंदर पिचाई

टेक विश्वातील प्रसिद्ध कंपनी गुगल (Google) मध्ये पुन्हा एकदा नोकरकपात करण्यात आली आहे. याचा खुलासा सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, हा निर्णय कंपनीचे कामकाज सरळ बनवण्यासाठी तसेच उत्पादकता वाढवण्याच्या उद्देश्याने घेण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या गुगलने टॉप मॅनेजमेंटमध्ये काम करणाऱ्या आपल्या जवळपास १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

कंपनीने २०२४ मध्ये अनेक वेळा नोकर कपात केली असून हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. बिझनेस इनसायडरच्या रिपोर्टनुसार, या आठवड्यात ऑल-हैंड्स मीटिंगमध्ये सीईओ सुंदर पिचाई यांनीही कर्मचाऱ्यांना हीच गोष्ट सांगितली आणि गुगलने आपली टीममध्ये कपात केल्याचे सांगितले.

या बैठकीत सुंदर पिचाई म्हणाले की, गुगलने गेल्या काही वर्षांत मोठे बदल केले आहेत, ज्याचा उद्देश कंपनीला पूर्वीपेक्षा सरळ आणि कार्यक्षम बनविणे आहे. या बैठकीत सहभागी असलेल्या गुगलच्या दोन कर्मचाऱ्यांनी हा अहवाल दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने मॅनेजर, डायरेक्टर आणि व्हाइस प्रेसिडेंट या पदांमध्ये १० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे.

गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, यापैकी काही कर्मचारी जे टॉप मॅनेजमेंटचा भाग होते त्यांना नॉन-मॅनेजमेन्टल पदांवर हलवण्यात आले आणि इतरांना कंपनीतून काढून टाकण्यात आले.

पिचाई यांनी गुगलला २० टक्के कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर २०२२ मध्ये सर्वात मोठी नोकर कपात जाहीर केली होती आणि जानेवारी २०२३ मध्ये एकाच वेळी सुमारे १२,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने म्हटले होते की, ते आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ६ टक्के कमी करत आहेत. गुगलने शेअर केलेल्या खुल्या पत्रात पिचाई म्हणाले की, कंपनीने वेगवेगळ्या परिस्थितीत नोकरभरती केली होती आणि आता परिस्थिती बदलली आहे.

त्याचप्रमाणे पिचाई यांनी जानेवारी २०२४ मध्ये एक मेमो पाठवून नोकरकपातीचा उल्लेख केला होता, परंतु २०२४ मध्ये गेल्या वर्षीप्रमाणे हजारो नोकऱ्या एकत्र गेल्या नाहीत. पिचाई यांनी पुन्हा एकदा ले ऑफचा उल्लेख केला आहे, त्यामुळे सध्याच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्याबाबतही अंदाज बांधले जात आहेत.

खरे तर ओपनएआयसारख्या एआय टूल्सवर काम करणाऱ्या कंपन्यांनी गुगलसमोर आव्हान उभे केले आहे. यामुळेच गुगल एआयवर ही लक्ष केंद्रित करत आहे असून कंपनीला अशा कर्मचाऱ्यांची गरज नाही जे जुन्या प्रोजेक्ट्सवर काम करत होते, जे आता बंद केले जात आहेत. 

Whats_app_banner