आता माणसांप्रमाणे AI शी साधता येणार संवाद! या स्मार्ट फोनमध्ये मिळणार Google Gemini Live फीचर-google gemini live launched and you can talk to the ai tool as if its a human ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आता माणसांप्रमाणे AI शी साधता येणार संवाद! या स्मार्ट फोनमध्ये मिळणार Google Gemini Live फीचर

आता माणसांप्रमाणे AI शी साधता येणार संवाद! या स्मार्ट फोनमध्ये मिळणार Google Gemini Live फीचर

Aug 14, 2024 02:24 PM IST

Google चे जेमिनी एआय टूलबाबत मोठी अपडेट आली आहे. कंपनीने आपल्या मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये जेमिनी लाइव्ह लॉन्च केले आहे. गूगलचे यूझर या टूलसोबत आता माणसासारखा संवाद साधू शकणार आहे.

आता माणसांप्रमाणे AI शी साधता येणार संवाद! या स्मार्ट फोनमध्ये मिळणार Google Gemini Live फीचर
आता माणसांप्रमाणे AI शी साधता येणार संवाद! या स्मार्ट फोनमध्ये मिळणार Google Gemini Live फीचर (Google)

Google Gemini Live feature : सॉफ्टवेअर कंपनी Google ने गेल्या मंगळवारी मेड बाय Google इव्हेंटमध्ये Pixel ९ मालिका आणि विविध उपकरणे लाँच केले आहेत. याशिवाय, कंपनीने त्यांच्या जेमिनी एआय टूलमध्ये देखील मोठे अपग्रेड केले आहेत. गुगलने गूगल जेमीनी लाईव्ह हे नवे फीचर लाँच केले आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित टूलसोबत यूझर माणसांसारखे संवाद साधू शकणार आहेत. या सोबत विविध माहिती देखील ते मिळवू शकणार आहेत.

गूगलनं या संदर्भात माहिती देतांना सांगितलं आहे की, गूगल पिक्सेल लाइनअपला गूगल जेमीनी लाईव्हला सपोर्ट आणि ऍक्सेस देणारे पहिले टूल असेल. हे टूल काही दिवसांनी सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून दिले जाऊ शकते. हे टूल इंग्लिश भाषेत माणसांशी संवाद साधण्यास सक्षम आहे. तसेच कोणतीही टेक्स्ट कमांड न देता फक्त एआयशी बोलून कामे सहज करता येणार आहे. विशेष बाब म्हणजे जेमिनी लाइव्ह भूतकाळातील घटना देखील लक्षात ठेवू शकते आणि त्यावर आधारित माहिती किंवा निकाल देखील दाखवण्यास सक्षम आहे.

गूगलच्या जेमिनी लाइव्ह एआय डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन माहिती उपलब्ध करून देत असून कंपनीने स्पष्ट केले आहे की यूजर्सला डेटा लीक सारख्या कोणत्याही धोक्याची भीती राहणार नाही. वापरकर्त्यांना १० भिन्न आवाजात ही माहिती मिळणार आहे. ज्यामधून ते त्यांचा आवडता आवाज निवडून या एआय टूलशी संवाद देखील साधू शकणार आहेत. मल्टीमोडल इनपुट सपोर्टसह मजकूर, आवाज आणि प्रतिमा देखील या टूल मार्फत वापरकर्त्यांना मिळवता येणार आहे.

वापरकर्त्यांना लेटेस्ट जेमिनी लाइव्ह इन जीमेल आणि गूगल मेसेज ॲपमध्येही प्रवेश देणार आहे. त्यामुळे वापरकर्ते सहजपणे या ॲप्समध्ये फोटो ड्रॅग आणि ड्रॉप करू शकणार आहेत. याशिवाय, त्यांना सोप्या कमांड देऊन, त्या बदल्यात त्यांना योग्य माहिती दिली जाईल आणि ते यूट्यूब व्हिडिओंशी संबंधित माहिती देखील गोळा करू शकणार आहेत.

जेमिनी लाईव्ह वापरण्यासाठी काय करावे लागेल?

जेमिनी लाइव्ह आणि हे नवे टूल वापरू इच्छिणाऱ्यांना Gemini Advanced चे सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. सध्या याचे सदस्यता शुल्क २० डॉलर (सुमारे १६७८ रुपये) ठेवण्यात आले आहे. मोफत वापरकर्त्यांना निश्चितपणे जेमिनीमध्ये प्रवेश दिला जात आहे परंतु असे वापरकर्ते ही प्रगत वैशिष्ट्ये वापरू शकणार नाहीत.

विभाग