Samsung Galaxy A Series: गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला काही प्रगत क्षमतेसह आपले नवीन एआय-संचालित फीचर सर्कल टू सर्च फीचरची घोषणा केली. हे फीचर पिक्सल आणि काही हाय-एंड स्मार्टफोनपुरते मर्यादित आहेत. मात्र, आता सॅमसंगने आपल्या ग्राहकांसठी हे फीचर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. सॅमसंगचा आगामी सीरिज गॅलेक्सी ए सीरिज आणि गॅलेक्सी टॅब एस९ एफईमध्ये सर्कल टू सर्च फीचर देणार आहे, ज्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.
सर्कल टू सर्च हे एआय-संचालित वैशिष्ट्य आहे, जे वापरकर्त्यांना केवळ वर्तुळ रेखाटून पृष्ठावर उपलब्ध वाक्ये, शॉपिंग आयटम आणि इतर गोष्टी त्वरित शोधण्यास मदत करते. हे फीचर युजर्सला संबंधित रिझल्टसह गुगल सर्चवर लगेच डायरेक्ट करेल. यापूर्वी हे फीचर फक्त सॅमसंग गॅलेक्सी एस २४ सीरिजपुरते मर्यादित होते आणि नंतर अनेक पिक्सल स्मार्टफोन्समध्येही गुगलचे हे फीचर आले. मात्र, आता गुगल आणि सॅमसंग गॅलेक्सी ए सीरिजस्मार्टफोन्स, गॅलेक्सी टॅब एस ९ एफई आणि टॅब एस ९ एफई + वापरकर्त्यांपर्यंत आपल्या वापरकर्त्यांचा विस्तार करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना पडवणाऱ्या किंमतीत एआय फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.
स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स देण्यासाठी अनेक स्मार्टफोन कंपन्यामध्ये स्पर्धा वाढली. सॅमसंग कंपनीने आपल्या अनेक स्मार्टफोनमध्ये एआय फीचर्स देण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते आपल्या ग्राहकांना अधिक सुलभ होतील. प्रत्येक लॉन्चिंगसह सॅमसंग फ्लॅगशिप आणि फोल्डेबल्समध्ये नवीन आणि समृद्ध गॅलेक्सी एआय वैशिष्ट्ये अनुभवत आहोत.
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, गॅलेक्सी ए ५५, ए ५४, ए ३५ आणि ए ३४ युजर्सना या महिन्याच्या अखेरीस सर्कल टू सर्च फीचर मिळेल. गॅलेक्सी टॅब एस ९ एफईसीरिज युजर्ससाठी हे फीचर केव्हा रोलआउट केले जाईल, याचा खुलासा करण्यात आलेला नाही. एआय फीचर्समुळे अनेक गोष्टी सुलभ होणार आहेत.