gold silver price today 27 june 2024 : सोन्या-चांदीमध्ये गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावातील घसरण सुरूच आहे. मागच्या चार दिवसांचा घसरणीचा ट्रेंड आजही कायम आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२७४६ रुपये प्रति १० ग्रॅमवरून आज १६६३ रुपयांनी कमी होऊन ७१०८३ रुपये झाला आहे. तर, चांदीचा भाव ८६७६१ रुपयांवर आला आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव आज १८४ रुपयांनी घसरून तोळ्यामागे ७१०८३ रुपये झाला आहे.
२३ कॅरेट सोन्याचा भाव १८४ रुपयांनी घसरून ७०७९८ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव १६९ रुपयांनी घसरून तोळ्यामागे ६५११२ रुपये झाला आहे.
१८ कॅरेट सोन्याचा भाव १३८ रुपयांनी घसरून तोळ्यामागे ५३३१२ रुपये झाला आहे.
१४ कॅरेट सोन्याचा भाव १०७ रुपयांनी घसरून ४१५८४ रुपये झाला आहे.
चांदीतही १८३ रुपयांची घसरण झाली असून आज ती ८६७६१ रुपयांवर आली आहे.
जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याचा भाव ७२,९२१ रुपये प्रति १० ग्रॅम असेल. इतर शुल्कांसह तो ८०२१४ रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळपास असेल. मात्र २२ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ६७०६५ रुपयांवर आला आहे. दागिने बनविण्याचं शुल्क आणि नफा जोडल्यानंतर तो सुमारे ७३७७१ रुपये प्रति १० ग्रॅम दर असा असेल.
जीएसटीसह १८ कॅरेट सोन्याची किंमत ५४९११ रुपये आहे. ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि नफा मिळून त्याची किंमत ६०४०२ रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत जात आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह तोळ्यामागे ७३,२१५ रुपये असेल. मात्र, जीएसटीमुळे चांदीचा भाव ८९३६३ रुपये प्रति किलो होणार आहे.
(डिस्क्लेमर: सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेस नाहीत. त्यामुळं तुमच्या शहरातील सोन्या-चांदीच्या प्रत्यक्ष दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.)
संबंधित बातम्या