Multibagger Stock : बाजार कोसळत असताना उसळत होता 'हा' शेअर; एका महिन्यात किती परतावा दिला पाहा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Multibagger Stock : बाजार कोसळत असताना उसळत होता 'हा' शेअर; एका महिन्यात किती परतावा दिला पाहा!

Multibagger Stock : बाजार कोसळत असताना उसळत होता 'हा' शेअर; एका महिन्यात किती परतावा दिला पाहा!

Jan 18, 2024 07:40 PM IST

Golkunda Diamonds & Jewellery share price : हिरे व दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित गोलकुंडा डायमंड्स कंपनीनं गुंतवणूकदारांची गरिबीच दूर केली आहे.

Golkunda Diamonds & Jewellery Ltd
Golkunda Diamonds & Jewellery Ltd

Golkunda Diamonds & Jewellery share price : मागच्या दोन दिवसांपासून सेन्सेक्स व निफ्टीतील घसरणीमुळं शेअर बाजारात हाहाकार उडाला असताना एका कंपनीनं गुंतवणूकदारांना मालामाल करून टाकलं आहे. या कंपनीचा शेअर आज तब्बल २० टक्क्यांनी वाढला असून मागच्या अवघ्या एका महिन्यात या शेअरनं गुंतवणूकदारांना १४३ टक्के परतावा दिला आहे.

गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरी असं या कंपनीचं नवा आहे. डायमंड्स आणि दागिने उद्योगाशी संबंधित या कंपनीचे शेअर्स आज मोठ्या उसळीसह २७३.३० रुपयांवर पोहोचले. गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरीचे शेअर्स गेल्या एका महिन्यात १४३ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअरची किंमत ११२ रुपयांवरून २७३ रुपयांवर गेली आहे. कंपनीचे शेअर आज ५२ आठवड्यांच्या नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत.

Gold Silver Rate : लगीनसराई सुरू असताना सोन्याच्या भावात घसरण, चांदीचा रंगही उडाला!

पाच दिवसांत ७२ टक्क्यांची वाढ

गोलकुंडा डायमंड्स अँड ज्वेलरीच्या शेअर्समध्ये ५ दिवसात ७२ टक्क्यांची भरीव वाढ झाली आहे. कंपनीचे शेअर्स ५ दिवसांत १५८.९० रुपयांवरून २७३.३० रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांत गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरीच्या शेअर्समध्ये १६७ टक्के वाढ झाली आहे. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स १०२.२५ रुपयांवर होते. १८ जानेवारी २०२४ रोजी गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरीचे शेअर्स २७३.३० रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८५.६५ रुपये आहे.

चार वर्षात १९०० टक्क्यांची वाढ

गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरीचे शेअर्स गेल्या ४ वर्षांत १९५३ टक्के वाढले आहेत. १७ जानेवारी २०२० रोजी कंपनीचे शेअर्स १३.२९ रुपयांवर ट्रेड करत होते. हेच शेअर्स आज १८ जानेवारी २०२४ रोजी २७३.३० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या ३ वर्षांत गोलकुंडा डायमंड्स आणि ज्वेलरीच्या शेअर्सनी १३२१ टक्क्यांची झेप घेतली आहे. या कालावधीत कंपनीचे शेअर्स १९.२५ रुपयांवरून २७३ रुपयांपर्यंत वाढले आहेत. रत्न आणि दागिने उद्योगाशी संबंधित कंपन्यांचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत ८९ टक्क्यांनी वाढले आहेत.

(डिस्क्लेमर : वरील लेख केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. गुंतवणूक करताना संबंधितांनी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून निर्णय घ्यावा.)

Whats_app_banner