मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Landmark IPO : लिस्टिंगनंतर ‘या’ आयपीओवर परकीय गुंतवणूकदार फिदा, खरेदी केले ३.९२ लाख शेअर्स

Landmark IPO : लिस्टिंगनंतर ‘या’ आयपीओवर परकीय गुंतवणूकदार फिदा, खरेदी केले ३.९२ लाख शेअर्स

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Dec 26, 2022 06:11 PM IST

Landmark IPO : लँडमार्क कार्सच्या शेअर्समध्ये लिस्टिंगच्या नंतर गोल्डमॅन सॅकने या कंपनीत हिस्सेदारी खरेदी केली आहे. कंपनीजवळ मर्सिडिज, होंडा, जीप, वोक्सवॅगन आणि रेनाॅल्टची डिलरशीप आहे.

landmark_IPO
landmark_IPO

Landmark IPO : लँडमार्क कार्सच्या शेअर्समध्ये लिस्टिंगच्या नंतर गोल्डमॅन सॅकने या कंपनीत हिस्सेदारी खरेदी केली आहे. कंपनीजवळ मर्सिडिज, होंडा, जीप, वोक्सवॅगन आणि रेनाॅल्टची डिलरशीप आहे.

शेअर बाजारात गेल्या आठवड्यात शुक्रवारी लॅडमार्क कार्सच्या शेअर्सची लिस्टिंग झाली. कंपनीचे शेअर्स पहिल्या दिवशी ७ टक्के सवलतींसह लिस्ट झाले. लॅडमार्क कार्सच्या शेअर्समध्ये गोल्डमॅन सॅक कंपनीने हिस्सा खरेदी केला आहे. कंपनीजवळ मर्सिडिज, होंडा, जीप, वोक्सवॅगन आणि रेनाॅल्टची डिलरशीप आहे.

एनएसईवर उपलब्ध माहितीनुसार, गोल्डमॅन सॅक इंडिया इक्विटी पोर्टफोलियोने ३,९२,४२१ लॅडमार्क कार्सचे शेअर्स खरेदी केले आहेत. गोल्डमॅन सॅकने हे शेअर्स ४६६.५५ रुपये प्रती शेअर्स दराने खरेदी केले. याचाच अर्थ, गोल्डमॅन सॅकने लॅडमार्क कार्समध्ये १८.३० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तज्ज्ञांनी दिले टार्गेट

लॅडमार्क कार्सजवळ मर्सिडिज, होंडा, जीप, वोक्सवॅगन आणि रेनाॅल्टची डिलरशीप आहे. शेअर बाजाराच्या तज्ज्ञांनुसार, लॅडमार्क कार्स हाय एंड कार डिलरशीपमध्ये गुंतवणूक करते. जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी आल्यावर कंपनीच्या विक्रीमध्ये तेजी येईल असे सुतोवाच तज्ज्ञांनी केले आहे. त्यामुळे ४८० रुपये रिसेट टार्गेट आणि ६६० रुपयांच्या दीर्घ टारगेटसह स्टाॅक होल्ड करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

कंपनीच्या शेअर्सची खराब लिस्टिंग

लॅडमार्क कार्सच्या शेअर्सनी शुक्रवाकी एनएसईवर ४७१ रुपये प्रती शेअर्सवर स्टाॅक लिस्टिंगसह सुरुवात केली होती. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग आयपीओ प्राईस बॅड ५०६ रुपये प्रती शेअर्सच्या तुलनेत ७ टक्के अधिक सवलतींच्या दरात झाली. बीएसईवर लॅडमार्क कार्सच्या शेअर्सनी ४७१ रुपये प्रती शेअर्सवर व्यवहार सुरु केला.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग