लग्नकार्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा! अवघ्या महिनाभरात सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  लग्नकार्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा! अवघ्या महिनाभरात सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त

लग्नकार्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा! अवघ्या महिनाभरात सोनं ४ हजार रुपयांनी स्वस्त

HT Marathi Desk HT Marathi
Nov 26, 2024 01:48 PM IST

Gold Silver Price Today : लग्नकार्याच्या खरेदीचं नियोजन करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या महिनाभरात सोने व चांदीच्या भावात मोठी घट झाली आहे.

सोन्याचा भाव 4,230 रुपयांनी घसरून 10,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला
सोन्याचा भाव 4,230 रुपयांनी घसरून 10,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला

Gold Silver Price Today : लग्नकार्य काढलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १६३० रुपयांनी कमी होऊन सरासरी ७५,४५१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदीच्या दरात १३४५ रुपयांची घसरण झाली आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हे दर जारी केले आहेत. त्यात जीएसटीच्या रकमेचा समावेश नाही. त्यामुळं तुमच्या शहरातील प्रत्यक्ष दरात १००० ते २००० रुपयांची तफावत असण्याची शक्यता आहे.

दरात किती झाली घसरण?

३० ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर ७९,६८१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ९८,३४० रुपये प्रति किलो होता. त्या तुलनेत आज सोनं ४२३० रुपयांनी तर चांदी १०२४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७५,१४९ रुपयांवर आला आहे. २२ कॅरेट सोन्याचा सरासरी दर १४९३ रुपयांनी कमी होऊन ६९,११३ रुपये झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ४६,६८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

मुंबईत सोन्या-चांदीचे दर किती?

मुंबईत आज सोन्याचा भाव तोळ्यामागे ७८,५६७ रुपये आहे. सोमवारी सोन्याचा भाव ७९,६६७ रुपये होता तर गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव ७६,३४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. मुंबईत आज चांदीचा भाव ९३,८०० रुपये प्रति किलो तर सोमवारी ९४,४०० रुपये होता. गेल्या आठवड्यात हा दर ९१ हजार ८०० रुपये किलो होता.

दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव तोळ्यामागे २० रुपयांनी घसरून ३८,१०० रुपये झाला आहे. सोमवारी तो ७९८१३ रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७६,४९३ रुपये होता. आज चांदीचा भाव ९४,५०० रुपये प्रति किलो तर सोमवारी ९५,१०० रुपये प्रति किलो होता.

चेन्नईत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,५६१ रुपये आणि सोमवारी ७९,६६१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्यात तो ७६,३४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर चेन्नईत आज चांदीचा भाव १,०३,१०० रुपये प्रति किलो आहे. काल तो १,०३,७०० रुपये आणि गेल्या आठवड्यात चांदीचा दर १,०१,६०० रुपये प्रति किलो होता.

कोलकात्यात आज सोन्याचा भाव ७८,५६५ रुपये प्रति १० ग्रॅम असून गेल्या आठवड्यात तो ७६,३४५ रुपये होता. कोलकात्यात आज चांदीचा भाव ९५,३०० रुपये प्रति किलो होता तर गेल्या आठवड्यात ९३,३०० रुपये प्रति किलो होता.

Whats_app_banner