Gold Silver Rate Today : सोने व चांदीच्या दरात वाढ; पाहा मुंबईतील आजचा भाव
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver Rate Today : सोने व चांदीच्या दरात वाढ; पाहा मुंबईतील आजचा भाव

Gold Silver Rate Today : सोने व चांदीच्या दरात वाढ; पाहा मुंबईतील आजचा भाव

Dec 22, 2023 03:21 PM IST

Gold Silver rate in Mumbai Today : सोने व चांदीच्या दरात आज वाढ झालेली आहे. जाणून घेऊया मुंबईतील आजचे दर…

Gold Silver prices today
Gold Silver prices today

Gold Silver Rate Today in Mumbai : सोने व चांदीच्या दरात आज काही प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत दहा ग्रॅम सोन्याचा भाव ६३,२३० रुपये आहे. तर, एक किलो चांदीचा भाव ३०० रुपयांनी वाढून ७९,५०० रुपयांवर गेला आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

मुंबईत काल २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम म्हणजे एक तोळ्याला ६३,००० रुपये इतका होता. तो आज ६३,२५० रुपये झाला आहे. तर चांदीचा आजचा भाव किलोमागे ७९,५०० रुपये आहे. काल चांदीचा भाव किलोमागे ७९,२०० रुपये होता. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात ३०० रुपयांची वाढ झाली आहे.

Smartphones Offers: १५ हजारपेक्षा कमी किंमतीत मिळत आहेत 'हे' जबरदस्त फोन; यादीत टॉप ब्रँड!

मुंबईतील सोन्याचे आजचे दर

२४ कॅरेट - ६३,२५० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

२२ कॅरेट - ५८,००० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

१८ कॅरेट - ४७,४५० रुपये (१० ग्रॅम किंवा एक तोळा)

सोने-चांदीच्या दरात चढउतार का होतात?

भारतात सर्वसाधारणपणे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन सोने व चांदीचे भाव निश्चित करते. त्यासाठी काही घटकांचा आधार घेतला जातो. सोन्या-चांदीच्या किमतीतील चढ-उतारांना अनेक घटक कारणीभूत असतात. त्यात आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील घटकही कारणीभूत असतात. मोठ्या शहरांमध्ये त्या-त्या शहरांतील मोठे व्यापारी भाव निश्चित करतात.

संपत्ती वाढीच्या बाबतीत अंबानी, अदानींनाही मागे टाकणाऱ्या सावित्री जिंदाल आहेत कोण? किती आहे संपत्ती?

जगभरात असलेली सोन्याची मागणी, देशा-देशांच्या चलनमूल्यातील फरक, सध्याचे व्याजदर आणि सोन्याच्या व्यापारासंदर्भातील सरकारी नियम या सर्व बाबी भावांमधील चढउतारास कारणीभूत ठरतात. शिवाय, जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणि इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची ताकद याचाही सोने व चांदीच्या किंमतीवर परिणाम होत असतो.

दरांतील चढउताराचा प्रवास

मुंबईतील चांदीचे दर गेल्या काही वर्षांपासून घसरलेले आहेत. २००८ साली लेहमन ब्रदर्सच्या संकटानंतर चांदीचे दर वाढले. पुढं त्यात सतत वाढ झाली. गेल्या काही वर्षांत ते पुन्हा स्थिरावले आहेत. अलीकडच्या काळात लोकांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं आहे. त्याचा परिणाम सोने व चांदीतील गुंतवणूक, मागणी व पर्यायानं दरावर झाला आहे. मात्र, २०१८ पासून मुंबईतील सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूकदार पुन्हा सोने व चांदीकडं वळल्याचा हा परिणाम आहे.

Whats_app_banner